शैक्षणिकसामाजिक

डिपेक्स २०२६ मध्ये शासकीय आयटीआय परळीला मिळाला द्वितीय पुरस्कार

परळी/प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर येथील एमआयटी कॅम्पस येथे डीपेक्स २०२६ तंत्र प्रदर्शन दि. ५ ते ८ मार्च रोजी पार पडले.यामध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परळी वैजनाथ च्या वीजतंत्री व्यवसाया च्या ट्रान्समिशन लाइन प्रोटेक्शन या प्रकल्पास इलेक्ट्रिकल सेक्शन मध्ये द्वितीय पारितोषक मिळाले.

सदरील प्रकल्प सृष्टी काळे,निशा मुंडे, ज्ञानेश्वरी मुंडे,भारती कसबे,मनीषा गित्ते या प्रशिक्षणार्थ्यांनी श्री. किशोर पवार व श्री. जाधव निखिल शिल्प निदेशक वीजतंत्री व श्रीमती केंद्रे मॅडम यांच्या मार्गदर्शनखाली पूर्ण केला.मुंबई येथे झालेल्या डिपेक्स २०३४ मध्ये ही आय टी आय परळी ने तृतीय पारितोषिक मिळविले होते.

या सातत्य पूर्ण यशाबद्दल जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी डॉ.श्री.पी.डी उखळीकर साहेब व संस्थेचे प्राचार्य श्री संतोषजी लोखंडे साहेब, संस्था व्यवस्थापन समिती चेअरमन श्री.हरिदास आलुरे,गटनिदेशक श्री. एम.जी.पुजारी सर व श्री.नवसुपे सर यांनी विजेत्या प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक केले.या यशा बद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!