प्रशासकीयसामाजिक

ऑडिटर कौन्सिलच्या राज्यस्तरीय अधिवेशनास प्रमाणित लेखा परीक्षकांनी उपस्थित रहावे – सी.ए. खोडसे लेखापरीक्षक सहकारी संस्था बीड 

केज/प्रतिनिधी

ऑडिटर कौन्सिल अँड वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील अतिशय सुंदर,स्वच्छ, निसर्गरम्य आध्यात्मिक क्षेत्र असलेल्या श्री.संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये धर्मशाळा देवांची आळंदी जिल्हा पुणे येथे आपले राज्यस्तरीय अधिवेशन दि.२१ व २२मार्च २०२६ रोजी आयोजित केले आहे.या अधिवेशनास संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून प्रमाणीत लेखापरीक्षक उपस्थित राहणार असून या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सी.ए.खोडसे प्रमाणित लेखापरीक्षक सहकारी संस्था बीड यांनी केले आहे.

या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, श्री.मुरलीधरजी मोहोळ केंद्रीय सहकार राज्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून श्री. बाबासाहेब पाटील सहकार व पणन मंत्री, श्री.दत्ता (मामा) भरणे कृषिमंत्री,श्री.पंकजजी भोयर सहकार राज्यमंत्री श्री.दीपकजी तावरे साहेब सहकार आयुक्त तथा निबंधक महाराष्ट्र राज्य,तसेच प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक श्री.अनिलजी कवडे साहेब आयुक्त राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे,श्री. तुषारजी काकडे अप्पर निबंधक लेखापरीक्षण सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य,श्री.राजेशजी जाधव साहेब सह निबंधक लेखापरीक्षण सहकारी संस्था तथा सचिव लेखा समिती राज्यस्तरीय, माननीय श्री प्रकाश जी जगताप जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण तसेच सहकार खात्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती लाभणार असून ते मार्गदर्शन करणार आहेत.

या अधिवेशन प्रसंगी लेखा परीक्षकांच्या अधिकार व जबाबदाऱ्या,विकास, सेवा संस्थेचे इ-ऑडिट, गृहनिर्माण संस्थेचे ऑडिट व निवडणुका, सहकार कायद्यातील निर्गमित केलेल्या परिपत्रकाचे बदलाव मार्गदर्शन सविस्तर विषयानुसार सहकार तज्ञ व्याख्याते मार्गदर्शन करणार करणार आहेत.

तसेच लेखा परीक्षकां मधून उत्कृष्ट लेखा परीक्षक म्हणून निवडले जाणार आहे,त्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.त्या ठिकाणी येणाऱ्या सर्व लेखा परीक्षक बंधू आणि भगिनींची दोन ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धती ची निवास व्यवस्था केलेली आहे,अधिवेशन ठिकाणी सकाळी सभासदांना नाष्टा,दुपारी जेवण संध्याकाळी टी व रात्री जेवण अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

१.सोबत अद्यावत शासकीय परिपत्रके असणारी दैनंदिनी,२. लॅपटॉप लेदर बॅग ३. प्रमाणपत्र,बॅग यांचा समावेश असणार आहे ४.राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय उत्कृष्ट लेखा परीक्षक पुरस्कार ५. लेखा परीक्षक यांना येणाऱ्या अडचणी व प्रश्नाबाबत खुले चर्चासत्र आयोजित केले आहे तरी लेखापरीक्षक बंधू,भगिनी यांनी राज्यस्तरीय अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सी.ए. खोडसे प्रमाणित लेखा परीक्षक सहकारी संस्था बीड यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!