सामाजिक

केज शहरातील वीजचोरी वर मोठी कारवाई,शितल सय्यद मॅडम यांच्या नेतृत्वाखाली २० लाखा पेक्षा जास्त महसूल वसूली करण्यात यश

केज/प्रतिनिधी

महावितरण कंपनीच्या कर्तव्यदक्ष अधिकारी शितल सय्यद मॅडम यांच्या प्रभावी कार्यशैली मुळे केज शहर तथा तालुक्यात वीजचोरी विरोधात मोठी कारवाई करण्यात येत असून, वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करत २० लाख रुपयापेक्षा अधिक शासकीय महसूल गोळा करण्यात आला आहे.

मागील महिन्यात दि.११ फेब्रुवारीपासून वसुलीची जबाबदारी पुन्हा सय्यद मॅडम व त्यांच्या टीमकडे सोपविण्यात आल्यानंतर फेब्रुवारी २०२६ मध्ये आजपर्यंत केज मधील सर्वाधिक म्हणजे तब्बल १६८% वसुली करण्यात यश आले आहे.ही कामगिरी विशेष उल्लेखनीय मानली जात आहे.याचबरोबर,सय्यद मॅडम यांच्या मार्गदर्शना खालील टीमने मागील महिन्यात ७० पेक्षा अधिक वीजचोरीच्या घटना उघडकीस आणल्या असून,या कारवाईमुळे महावितरण कंपनीसाठी २० लाख रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळवून दिला आहे.सय्यद मॅडम यांनी कर्मचाऱ्यांना निर्भीडपणे कर्तव्य बजावण्याचे धडे देत सर्वांना सोबत घेत कार्य केले.त्यांच्या नेतृत्वा मुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून,केज शहर व तालुक्यातून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कर्तव्यदक्ष अधिकारी लाभल्यामुळे केज तालुक्यातील महा वितरण विभागाची कामगिरी उंचावली असून,अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

केज शहरातील काही वीजचोरी करणारे ग्राहक दंडात्मक कारवाईमुळे मला व महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धमक्या देत बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.मात्र अशा प्रकारांना न घाबरता महावितरण व केज पोलिसांच्या माध्यमातून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

-शितल सय्यद शाखा अभियंता,महा वितरण कंपनी केज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!