जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेत सी.व्ही.रमण व मेरी क्युरी जयंती साजरी.

केज/प्रतिनिधी
दि.7 नोव्हेंबर 2025 रोजी सी.व्ही.रमण व मादाम मेरी क्युरी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पुजन करून अभिवादन केले.चंद्रशेखर वेंकट रमण यांचा जन्म तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथे झाला ते भारतीय भौतिक शास्त्रज्ञ होते.1930 मध्ये प्रकाश विखुरण्यासाठी त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले असे आपल्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळा केंद्र केज मुलांची ता.केज शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ कदम यांनी सांगितले.
भारत सरकार तर्फे दरवर्षी राष्ट्रीयविज्ञान दिन म्हणून हा दिवस ओळखला जातो.रमण हे1933 साली बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये पहिले भारतीय संचालक बनले. मादाम मेरी क्युरी या पोलिश वंशाच्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ होत्या. त्यांचा जन्म दि.7 नोव्हेंबर 1867 रोजी झाला.त्या रेडिओ अॕक्टिव्हिटीवरील (किरणोत्सर्गी)कामासाठी प्रसिद्ध आहेत.त्यांनी दोनदा नोबेल पारितोषिक जिंकले आणि फ्रान्समध्ये डॉक्टर ऑफ सायन्स पदवी मिळविणारी पहिली महिला होत्या.त्यांनी किरणोत्सर्गी संस्थानिकांचे पृथक्करण करण्यासाठी तंत्रांचा शोध लावला.
भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक पती पियरे क्युरी आणि हेन्री बेकरेल यांच्यासोबत मिळाले. नोबेल पारितोषिक मिळविणारी पहिली महिला.दोन वेगवेगळ्या विज्ञान शाखांमध्ये नोबेल पारितोषिक मिळविणारी पहिली महिला.स्वता:, पती व मुलगा यांना पारितोषिक मिळाले अशी माहिती श्री.राजाभाऊ कदम यांनी दिली.
या शाळेतील प्राथमिक पदवीधर शिक्षक डॉ.मुळे रामकिशन व संदीपठोंबरे, शिक्षक श्री.आकाश लोंढे, श्री.राहुल बचुटे, श्री.आबासाहेब धपाटे, शिक्षिका श्रीमती भोरे निलावती मॅडम,श्रीमती उटीकर अंजली, ट्रेनी शिक्षिका काळे रोहिणी, शापोआ.कामगार सुवर्णमाला पवार यांनी सखोल माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.राहुल बचुटे यांनी केले व आभार संदीप ठोंबरे सर यांनी मानले.


