क्रिडा

केज येथील बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी अश्विनी दहीभाते गोळा फेक स्पर्धेत प्रथम

केज/प्रतिनिधी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर द्वारा आयोजित जिल्हा स्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाची बी.एस्सी.तृतीय वर्षात शिकणारी विद्यार्थिनी कु. दहिभाते अश्विनी महादेव हिचा प्रथम क्रमांक आला असुन तिची सेंट्रल झोन साठी निवड झाली आहे.

अश्विनी दहीभाते च्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव रमेशराव आडसकर,डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजी नगर च्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या अर्चनाताई आडसकर, प्राचार्य डॉ. माधवराव फावडे, अधिक्षकपी.एस. भोसले, डी.एस. यादव यांनी अभिनंदन केले आहे.

बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाच्या वतीने अश्विनी दहीभाते व तिचे पालक यांचा सत्कार प्राचार्य डॉ. माधवराव फावडे यांनी केला.या प्रसंगी डी. एस. यादव, डॉ.सचिन शिंदे,डॉ.सौ.रतन गंगणेडॉ.अनिल गायकवाड, डॉ.काळम, डॉ.सरसरे व महाविद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!