देहाची अनासक्ती आणि मोहमायाचा त्याग हे भक्तीचे एक लक्षण – ह.भ.प.महंत भगवान महाराज शास्त्री

केज/प्रतिनिधी
ज्यांना देहाची आसक्ती नाही,जे शरीरा विषयी उदासीन आहे तसेच ज्यांच्या मनातील सर्व अशा पाश त्याग केला आहे हे भक्तीचे लक्षण आहे असे प्रतिपादन ह.भ.प.महंत भगवान महाराज शास्त्री वरपगावकर यांनी केले. विडा येथे प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेल्या राजा हनुमान महाराज जन्मोत्सव सोहळ्यातील आयोजित नाम सप्ताह किर्तन प्रसंगी बोलत होते.यावेळी त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी भक्ताची जी लक्षणे आहेत तो दर्शविणारा अभंग निरुपणाकरिता घेतला.
भक्त ऐसे जाणा जे देही उदास।गेले अशा पाश निवारुनी॥ विषय तो त्यांचा झाला नारायण ।
नावडे धन जन माता पिता॥निर्वाणी गोविंद असे मागे पुढे।काहीच साकडे न पडू नेदी॥
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य। घातलिया भये नरका जाणे ॥
पुढे बोलताना त्यांनी जो देवापासून विभक्त नाही तो भक्त,देवाशी वियोग नाही तो योगी जोदेवाच्या स्वरूपाला प्राप्त झाला तो ज्ञानी असे भगवत भक्तांचे अनेक लक्षण असून त्यातील काही लक्षणे या अभंगातून महाराजांनी सांगितले त्यापैकीच त्यांचा विषय फक्त नारायण झालेला असतो त्यांना धन जन माता पिता कोणीच आवडेनासा होतो आणि अशा भक्तांचा संभाळ प्रत्यक्ष गोविंद करतो.
यासाठी चांगल्या कर्माला सर्वांनी सहाय्य करावे असे म्हटले या प्रसंगी दादा महाराज मेटे, सखारामजी कदम, कल्याण आप्पा येवतेकर,तुषार महाराज, श्रीमंत भोसले,अशोक पटाईत,काका जाधव बबन पवार या भजनी मंडळीसह सोपान काका कुंभार,बाबासाहेब पटाईत,समीर सिंह देशमुख, पांडुरंग पवार, बळीराम देशमुख,संतोष भुजबळ,दत्ता पटाईत यांच्या सह बहुसंख्येने श्रोतावर्ग उपस्थित होता.



