केज तहसीलदार राकेश गिड्डे यांचा ‘उत्कृष्ट प्रशासकीय सेवा गौरव’ पुरस्काराने सन्मान

केज/प्रतिनिधी
केज तहसील कार्यालया चे कर्तव्यदक्ष व जनतेशी सुसंवाद साधणारे अधिकारी तहसीलदार राकेश जी गिड्डे यांचा त्यांच्या उल्लेखनीय प्रशासकीय कार्याची दखल घेत भव्य सन्मान करण्यात आला.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, तसेच राष्ट्रीय पत्रकार संघ केज यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना ‘उत्कृष्ट प्रशासकीय सेवा गौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
तहसीलदार गिड्डे यांनी आपल्या कार्यकाळात पारदर्शक, जलद आणि लोकाभिमुखप्रशासनाची अंमलबजावणी करत सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.महसूल विभागा तील विविध कामांमध्ये त्यांनी दाखवलेली तत्परता, निर्णयक्षमता आणि जनहिताची भूमिका यामुळे त्यांचे कार्य विशेष ठरले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पत्रकार संघटनांकडून हा सन्मान देण्यात आला.
या सन्मान सोहळ्याच्या वेळी पत्रकार हनुमंत भोसले, रामदास तपसे,गौतम बचुटे,संतोष गालफाडे, महादेव गायकवाड, पांडुरंग कसबे,चंद्रकांत पाटील तसेच संपादक अजय भांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांनी गिड्डे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
सन्मान स्वीकारताना तहसीलदार गिड्डे यांनी हा पुरस्कार आपल्या संपूर्ण प्रशासनिक टीमचा असल्याचे नमूद करत, पुढील काळातही नागरिकाभिमुख सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला.केज तालुक्यासाठी अभिमानास्पद क्षण ठरलेला हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.



