हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत भगवान श्रीकृष्ण मंदिरांचे भुमीपुजन संपन्न,ढोक महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता


केज/प्रतिनिधी
हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत भगवान श्रीकृष्ण मंदिरांचे भुमीपुजन श्री.१००८ स्वामी चिन्मय पुरीजी महाराज व भागवत भुषण ह.भ.प.केशव महाराज शास्त्री यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.यावेळी त्यांनी चुराचुराकर माखन खाया या अभंगावर काल्याचे किर्तन केले.यावेळी अभंगाचे निरुपण करताना ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांनी सांगितले की,मानवी जन्म भाग्याने मिळतो.तो भारत देशात मिळावा तसेच महाराष्ट्रात मिळावा हे परमभाग्य आहे.
देव,भक्त व नाम जिथे असेल तेथे काला होतो म्हणून महाराष्ट्रात काला होतो.देवाच्या प्रसाद अधिकारी मानवाला मिळतो म्हणून काला मिळतो असे त्यांनी सांगितले.स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे माझ्या किर्तनाला आवर्जून येत होते. ज्ञानेश्वर माऊली व मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजही किर्तन सेवा होत आहे. भगवान श्रीकृष्ण मंदिरांचे संपूर्ण स्टील राजाभाऊ घुले व विष्णु भाऊ घुले पुरवणार आहेत तसेच काल्याची पंगतही त्यांनी घेतली आहे. महा विष्णुयज्ञात पवित्र झालेली वीट घरी २०० देऊन भाविकांनी घरी न्यावी या जमा झालेल्या रक्कमेतुन वीटा मंदिर बांधकामासाठी वापरण्यात येणार आहेत असे ह.भ.प.केशव महाराज शास्त्री यांनी सांगितले.
आचरण रामाचे करावे तर चरीत्र कृष्णाचे उच्चारावे मागणी केल्या नंतर मिळते ते आश्वासन व न मागता मिळतो तो आशिर्वाद असे ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी सांगितले.बाल श्रीकृष्ण चरित्र सांगुन काल्याच्या किर्तनाची सांगता झाली.यावेळी पावनधाम संस्थानचे महंत ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री, रमेशराव आडसकर, युवा नेते रणजीत भैय्या आडसकर,सौरव भैय्या सोनवणे, रमाकांत बापू मुंडे,सुधाकर बापु लांब, अनंतराव घुले,श्रीकांत घुले,शिवराम घुले यांच्या सह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह.भ.प.केशव महाराज शास्त्री यांनी सप्ताह यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत. महाप्रसादाने कार्यक्रम संपन्न झाला.



