अध्यात्मिकसामाजिक

ढाकेफळ येथे भव्य अखंड हरिनाम सप्ताह ; ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख व अविनाश महाराज भारती यांचे किर्तन ठरणार मुख्य आकर्षण

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील ढाकेफळ येथे ता.केज जि.बीड येथे मिती चैत्र शु.१गुढीपाडवा दि १९ मार्च रोजी भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहात संपूर्ण मानव जातीला आध्यात्मिक मार्गावर नेण्याचा आणि संत परंपरेचा संदेश देण्याचा उद्देश ठेवण्यात आला असून संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा प्रसार करण्या वर विशेष भर देण्यात येणार आहे.सप्ताहात दररोज पहाटे काकडा भजन,विष्णुसहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन,शिव महापुराण कथा,प्रवचन,हरिपाठ, हरिकीर्तन व हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. शिवमहापुराण कथा ह.भ.प.अशोक (बापू) महाराज थोरात यांच्या प्रभावी वाणीतून सादर केली जाणार आहे.

या सप्ताहाचे मुख्य आकर्षण म्हणून ह.भ.प. अविनाश महाराज भारती यांचे दि.२१ मार्च शनिवारी रोजी सायंकाळी ९ ते ११ या वेळेत जनजागृतीपर किर्तन होणार असून त्यांच्या ओजस्वी सादरीकरणाची भक्तांना मोठी उत्सुकता आहे.

तसेच दुसरे प्रमुख आकर्षण म्हणून प्रसिद्ध विनोदी किर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे दि.२३ मार्च सोमवार सायंकाळी ५ ते ७ या वेळेत समाजप्रबोधनपर किर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्या प्रभावी शैलीमुळे भक्तांमध्ये विशेष उत्साह निर्माण होणार आहे.या शिवाय विष्णु महाराज थोरात यांचे दि १९ मार्च रोजी रात्री ९ ते ११,ह.भ.प.सोपान महाराज कन्हेरकर यांचे दि.२० मार्च रोजी रात्री ९ ते ११,ह.भ.प.पांडुरंग महाराज उगले यांचे दि. २२ मार्च रात्री ९ ते ११, ह.भ.प.विलास महाराज गेजगे यांचे दि.२४ मार्च रोजी रात्री ९ ते ११, ह.भ.प.बाळकृष्ण महाराज वसंतगडकर यांचे दि.२५ मार्च रोजी रात्री ९ ते ११ या वेळेत होणार आहे.यांसह अनेक नामवंतकिर्तनकार व प्रवचनकार सप्ताहात सहभागी होणार आहेत.

श्रीराम नवमीच्या दिवशी धर्मगुरू अमृत आश्रम स्वामी महाराज यांचे अमृततुल्य कीर्तन होणार आहे.किर्तनानंतर सार्वजनिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.यासप्ताहात विविध गावांतील हरिजागर, भजन,भारूड,तसेच ज्ञानेश्वरी ग्रंथ पालखी सोहळा आयोजित करण्यात येणार असून मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. सप्ताहाच्या निमित्ताने ज्ञानदान व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी व तरुण मित्र मंडळ, ढाकेफळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!