प्रशासकीय

मांजरा धरणातील कोळंबी व मासोळी पकडण्यासाठी कुशल मच्छीमारांनी संपर्क साधावा – चेअरमन लक्ष्मण सोनवणे 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील मांजरा प्रकल्पातील कोळंबी व मासोळी पकडण्यासाठी बाहेरील कुशल मच्छीमार यांनी संपर्क साधावा असे आवाहन मांजरा प्रकल्प मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित धनेगांवचे चेअरमन लक्ष्मण पांडुरंग सोनवणे यांनी केले आहे. त्यांनी प्रसिध्दीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे त्यामुळे मांजरा जलाशय मध्ये मागील वर्षीची कोळंबी व चालू वर्षात मासोळी संचयन केले आहे.

सदर कोळंबी व मासोळी पकडण्यासाठी बाहेरील कुशल मच्छीमाराने संस्थेकडे संपर्क साधावा असे आवाहन लक्ष्मण सोनवणे यांनी केले असून या दरम्यान शासनाच्या धोरणानुसार प्रति किलो योग्य मोबदला दिला जाणार आहे. असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मांजरा प्रकल्प मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित धनेगांवचे चेअरमन लक्ष्मण पांडुरंग सोनवणे यांनी केले आहे.तरी कुशल मच्छीमारांनी त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!