बीड येथे सनदी लेखापाल,प्रमाणित लेखा परीक्षक प्रशिक्षण वर्ग संपन्न

बीड/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म.पुणे चे सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर मा.विभागीय सह निबंधक सहकारी संस्था लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे जिल्ह्यातील सहकार विभागाचे पॅनेल वरील सनदी लेखापाल, प्रमाणित लेखा परीक्षक सहकारी संस्था यांच्या करीता दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा उप निबंधक सतीश तोटावर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून करण्यात आले.
यावेळी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक आर.व्ही. उबाळे यांची उपस्थिती होती.दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात जिल्हा उपनिबंधक श्री.सतीश तोटावर,आदेश नहार, सनदी लेखापाल बीड सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर चे प्राचार्य बी.जे. ठोंबरे,उप प्राचार्य एस. आर.कोळे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.समारोप प्रसंगी श्री.शिवराज नेहरकर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था केज यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्र संचलन आभार प्रदर्शन वर्ग संयोजक एस.आर.कोळे उप प्राचार्य सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर यांनी केले.



