अध्यात्मिक
सासुरा येथील अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने सांगता.

केज/प्रतिनिधी
दि.०६ मार्च शुक्रवारी रोजी केज तालुक्यातील सासुरा येथे श्रीसंत एकनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त काल्याचे किर्तन ह.भ.प. श्री.सुरेश महाराज जाधव यांचे झाले कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन मठाधिपती ह.भ.प.रतन महाराज सासुरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. या कार्यक्रमास विडा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजयकांत भैय्या मुंडे यांची विशेष उपस्थिती होती.काल्याचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.शेवटी महाप्रसादाचा भाविक भक्तांनी लाभ घेतला. यावेळी परिसरातील गुणवान गायक,वादक यांचा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.



