सामाजिक

जागतिक महिला दिना निमित्त बीडमध्ये भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन ; महिलांच्या कर्तृत्वाला सलाम

बीड/प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संकल्पनेतून व म्हाळसा महिला प्रतिष्ठाण,बीड यांच्या वतीने “नारी शक्ती – तुमच्या कर्तृत्वाला सलाम” या उपक्रमांतर्गत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि.१५ मार्च २०२६,रविवार, सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल ओलीव्ह,नगर रोड,बीड येथे होणार आहे.या स्पर्धेत महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार असून स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात येणार आहे.१० ते १७ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एक गट तर १७ वर्षांपुढील सर्व महिलांसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आला आहे. या उपक्रमातूनमहिलांमधील कलागुणांना वाव देणे आणि महिला शक्तीचा सन्मान करणे हा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

दोन्ही गटाला स्वतंत्र रोख रकमेची पारितोषिके ठेवण्यात आली आहे.स्पर्धेसाठी १७ वर्षांपुढील महिलां साठी प्रथम बक्षीस ७००० रुपये ठेवण्यात आले असून द्वितीय ५००० व तृतीय ३००० क्रमांकाच्या विजेत्यांनाही आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.उत्तेजनार्थ तीन पैठणी साड्याचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मनसे नेते मा.दिलीप (बापू) धोत्रे,मनसे सर चिटणीस संतोष (भाऊ) नागरगोजे,मनसे सरचिटणीस रिटाताई गुप्ता,मनसे बीड जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे,वक्फ बोर्ड अध्यक्ष समीर काझी, डी.वाय.एस.पी.पूजा पवार व शिक्षणाधिकारी प्रिया पाटील उपस्थित राहणार आहेत.या स्पर्धेचे आयोजन वर्षाताई जगदाळे (मनसे राज्य उपाध्यक्ष,अध्यक्ष – म्हाळसा महिला प्रतिष्ठाण,बीड) यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून मयुरी बाबर (सचिव – म्हाळसा महिला प्रतिष्ठाण,बीड) या समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मुली व महिलांनी 7385408999, 9284937132, 8308955941, 9822513879 या क्रमांकांवर संपर्क साधून नाव नोंदणी करावी,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.तसेच स्पर्धकांनी वेळेवर उपस्थित राहणेआवश्यक असून उशिरा आल्यास स्पर्धेतून बाद केले जाईल,अशी सूचना देण्यात आली आहे.

जागतिक महिला दिना निमित्त आयोजित या सांस्कृतिक उपक्रमामुळे बीड शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक मुली व महिला या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!