सामाजिक

बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्ञानोबाराव विडेकर (गुरुजी) यांचे वृद्धापकाळाने निधन ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास,विडा गावावर शोककळा

केज/प्रतिनिधी

बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेतृत्व ज्ञानोबाराव सोलेराव देशमुख (विडेकर गुरुजी) यांचे वृद्धापकाळाने दुखःद निधन झाले आहे. वयाच्या ९१ व्या वर्षी शुक्रवारी दि.२७ मार्च रोजी रात्री ८-३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.एक तत्वनिष्ठ राजकारणी आणि समाजसेवक विडेकर गुरुजी हे एक तत्वनिष्ठ राजकारणी,सज्जन आणि कार्यतत्पर व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण जिल्ह्यात परिचित होते.

आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे मार्गी लावली.विशेषतः सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले.सर्व स्तरातील लोकांशी त्यांचा दांडगा जनसंपर्क होता,ज्यामुळे ते सर्व सामान्यांचे नेते म्हणून ओळखले जात. अंत्यसंस्कार शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या मूळ गावी,विडा ता.केज येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.यावेळी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह पंचक्रोशी तील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विडेकर कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात स्वाभिमानी न्युज परिवार सहभागी असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!