
केज/प्रतिनिधी
मोलमजुरी करणाऱ्या मजुराच्या लेकीची पोलिस दलात निवड झाली असून,केज शहरातील वसंत कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने पुनम चाळक चा सत्कार करण्यात आला.याबाबत सविस्तर माहिती अशी की,जिद्द,चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर शुन्यातून विश्व निर्माण करता येते हे केज तालुक्यातील लव्हरी येथील पुनम वसंत चाळक या मोलमजुरी करणाऱ्या मजुराच्या मुलीने करुन दाखविले, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पोलिस दलात मजल मारली असून,तिने आई वडीलांच्या कष्टाने स्वप्न साकार केले आहे,पुनम चाळकची यशोगाथा आज ग्रामीण भागातील तरुण तरुणींना प्रेरणेचा स्त्रोत ठरत आहे.
पोटाला चिमटा घेऊन दिलेले शिक्षण पुनम चे वडील वसंत चाळक हे मजूर आहेत आर्थीकओढाताण पाचवीला पुजलेली असतानाही आपल्या मुलींने शिकुन स्वतःच्या पायावर उभे रहावे ही त्यांची जिद्द होती. पदोपदी गरीबीचे चटके सोसुन त्यांनी पुनमला शिक्षणासाठी आणि पोलिस भरतीच्या तयारी साठी रक्ताचे पाणी केले.
अथक परिश्रम आणि यश आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलण्याच्या इराद्याने पुनमने मैदानात उतरुन सराव सुरू केला. दररोज पहाटे धावणे, गोळा फेक,लांब उडी यांसारख्या शारीरिक चाचण्यांच्या सराव आणि सोबतच अभ्यासाचे सातत्य राखले.तिच्या या चिकाटीमुळे तिची पोलिस दलात निवड झाली आहे.
या यशाबद्दल वसंत कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने पुनम चाळक चा सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचे प्राचार्य धेंडे सर, उपप्राचार्य देशमुख सर, प्राचार्य फावडे सर,प्रा. चाळक सर,प्रा.मोगले मॅडम,प्रा समुद्रे सर,प्रा. धपाटे सर.प्रा.साखरे सर, लोंढे सर,रोडे सर,प्रा. घोळवे सर,सोळंके सर, पोटभरे सर,ठोंबरे सर, शेटे सर यांनी पुनम चाळक हिचा शाळेच्या वतीने सत्कार करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.



