जय भवानी कन्या शाळा येथे नगरपंचायत केज च्या वतीने मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना बक्षीस वाटप संपन्न,ज्येष्ठ नेते डॉ.हारूणभाई इनामदार, नगराध्यक्ष डॉ.सौ. सीताताई बनसोड व रणजीतदादा आडसकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती

केज/प्रतिनिधी
केज शहरातील नामांकित शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जय भवानी कन्या शाळा येथे नगर पंचायत केजच्या वतीने निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री.पी.एम देशमुख हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून केजच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष डॉ.सौ. सीताताई बनसोड,तसेच केज शहराचे ज्येष्ठ नेते डॉ.हारूणभाई इनामदार व युवा नेते रणजीतदादा आडसकर,शाळेचे ज्येष्ठ शिक्षक खुळे के.व्ही. यांची प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रथम सरस्वती पूजनानंतर प्रमुख पाहुण्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यानंतर यांना चित्रकला,स्पर्धेतून निबंध स्पर्धेत प्रथम,द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. निबंध स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रथम तांबवेकर भावना दत्तात्रय व वर्ग नववा, द्वितीय निकम मानसी मेघराज वर्ग सातवा,व तृतीय लांडगे सई दिनेश वर्ग सहावा तर चित्रकला स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रथम नाईकनवरे ऋतुजा तुकाराम वर्ग सातवा, द्वितीय सय्यद आयेशा फिरोज वर्ग आठवा, व तृतीय चौरे अमृता श्रीकृष्ण वर्ग पाचवा या विद्यार्थिनीचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यानंतर शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक श्री.पी.एम देशमुख यांनी प्रास्ताविक केले.यावेळी बोलताना त्यांनीशाळेच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार होणे ही शाळेच्या बाबतीत अभिमानास्पद बाब असल्याचे सांगितले याचा आम्हाला मला अभिमान असल्याचे आवर्जून सांगितले.
केजच्या नगराध्यक्ष डॉ.सौ.सीताताई बनसोड यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना आजही समाजात पुरुष आणि महिला किंवा मुलगा आणि मुलगी यामध्ये भेदभाव केला जातो.परंतु मुलींनी मुलापेक्षा आम्ही कशातही कमी नसल्याचे दाखवले आहे.याचेच उदाहरण म्हणजे मी एक महिला आज केज शहराची नगराध्यक्ष व प्रथम नागरिक असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
मुलींनी प्रत्येक क्षेत्रात आगेकूच करावी असेही त्यांनी आवाहन केले.ज्येष्ठ नेते डॉ. हारूणभाई इनामदार यांनी केज शहराच्या स्वच्छतेसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे सांगताना सर्वविद्यार्थ्यांनी व शिक्षकांनीही यासाठी अग्रेसर राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. केवळ स्वच्छता हा आमचा अधिकार आहे असे न म्हणता स्वच्छते साठी काम करणे माझेही कर्तव्य आहे असे म्हणणे गरजेचे आहे.तरच स्वच्छता व निरोगी वातावरण शहरात तयार होईल असे सांगितले.
आभार प्रदर्शन शाळे तील ज्येष्ठ शिक्षक श्री खुळे के.व्ही यांनी केले. यावेळी त्यांनी शाळेच्या विकासासाठी विद्यार्थी पालक व शिक्षण प्रेमी त्याचप्रमाणे रणजीत भैया आडसकर यांची सातत्याने पाठबळ मिळत असते म्हणूनच आम्ही शाळेमध्ये वेगळे उपक्रम राबवू शकतो असे सांगितले व कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री. गिरी एस.एम यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप शिंदे बी.एम यांनी केला.



