अध्यात्मिक

देहूच्या परंपरेचा वारसा जपणारे मराठवाड्या तील ‘प्रति देहू’ पावनधाम संस्थानात भक्तिसागर उसळला

केज/प्रतिनिधी

प्रति देहू म्हणून ओळख मिळवलेल्या पावनधाम संस्थानात श्री तुकोबारायांच्या सदेह वैकुंठगमन सोहळ्या निमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात भक्तिभावाचे वातावरण दाटून आले आहे. सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी ह.भ.प.माणिक महाराज मोरे (तुकोबारायांचे वंशज व माजी पालखी सोहळा प्रमुख) तसेच ह.भ.प. रामदास महाराज मोरे यांनी सदिच्छा भेट देत उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना ह.भ.प. माणिक महाराज मोरे म्हणाले की,पावनधाम संस्थान हे मराठवाड्या तील ‘प्रति देहू’ असून ज्या भाविकांना बीजेला देहूला येणे शक्य होत नाही,त्यांनी येथे अवश्य यावे.ही भूमी म्हणजे देहूचीच पवित्र छाया आहे असे ते भावनिक शब्दांत म्हणाले.

संस्थानातील प्रलंबित विकासकामे लवकरच पूर्ण होतील आणि देहू संस्थान पावनधामच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी त्यांनी महंत ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक करत,उपस्थित जन समुदायाला महाराजांच्या कार्यामागे एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले. सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीची कीर्तनसेवा ह.भ.प.डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांनी भावपूर्णरित्या पार पाडली.त्यांच्या कीर्तनातून तुकोबारायांच्या जीवनकार्याचा आणि भक्तीपरंपरेचा प्रभावी उलगडा झाला.

पावनधाम संस्थानात सुरू असलेल्या या सप्ताहामुळे परिसरात भक्ती,श्रद्धा आणि आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांची मोठी उपस्थिती लाभत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!