केज बसस्थानकात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

केज/प्रतिनिधी
केज बसस्थानकात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे. मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी, मराठी म्हणजे महाराष्ट्र, मराठीला माय म्हणून मराठी राजभाषाचा आदर करणाऱ्या सर्व प्रवासी व नागरिकांना मराठी राजभाषा भाषा दिनानिमित्त धारूर आगार अंतर्गत केज बसस्थानकाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
किल्ले धारूर आगार प्रमुख नवनाथ चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वाहतूक निरीक्षक बाबासाहेब कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत व ज्येष्ठ पत्रकार दैनिक चंपावती चे केज तालुका प्रतिनिधी धनंजय(मामा)देशमुख, यांच्या उपस्थितीत कवि श्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती अर्थात मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला.सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कवि श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धूप-दीपाने पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे व प्रवाशांचे पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी सहाय्यक निरीक्षक बाबासाहेब कदम,ज्येष्ठ पत्रकार धनंजय(मामा)देशमुख, वरिष्ठ लिपिक बालाजी बिक्कड, वाहतूक नियंत्रक बाळासाहेब, परमेश्वर मुंडे,राजेभाऊ शिंदे,अनिल क्षिरसागर यांच्या सह प्रवासी उपस्थित होते.



