अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता.

केज/प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीची स्पेशल केस क्र.६१ /२०२३ शासन विरुद्ध श्रीमंत या केसमधून सरकार पक्ष केस सिद्ध न करू शकल्यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की,दि.१ आॕक्टोबर २०२० रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास या प्रकरणातील फिर्यादीच्या मुलीचे कोल्हेवाडी ता.केज जि. बीड येथून फिर्यादीच्या चुलत पुतण्याने श्रीमंत गोपीनाथ खांडेकर रा. कोल्हेवाडी यांने अपहरण केले.व अक्कलकोट येथील अंधेवाडी येथील नितीन सुतार यांच्या रूमवर नेउन शरीर संबंध ठेवले.
त्यानंतर तपासीअंमलदार यांनी मोबाईलच्या लोकेशन वरून पीडीता व आरोपी यांना तेथून पोलीस स्टेशन केज येथे आणुन पिडीतेच्या जबाबावरून आरोपीच्या विरोधात गुन्हा कलम ३७६,३७६(२)376, (एफ)(एन)भारतीय दंड विधान व कलम ४,६,८, १० अन्वये गुन्ह्यात वाढ करून,पिडीतेचे मेडिकल करून व आरोपीला अटक करून तपासी अधिकारी एस.एम.काळे यांनी दोषारोपपत्र दाखल केले.सदरील प्रकरणात मा.जिल्हा व सत्र न्यायालय केज येथील श्री.एस.बी.भाजीपाले साहेब यांच्या समोर सरकार पक्षाने आरोपीच्या विरुद्ध वरील आरोपसिद्ध करण्यासाठी एकूण आठ साक्षीदार फितूर न होता तपासण्यात आले.
परंतु वरील आठही साक्षीदारांना आरोपी तर्फे अॕड.डी.एम. काजगुंडे यांनी केलेल्या उलट तपास व युक्तिवाद ग्राह्य धरून, सरकार पक्षाने आरोपीवर केलेले आरोप संशयाशिवाय सिद्ध करू न शकल्यामुळेआरोपीची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. प्रस्तुत प्रकरणात आरोपी च्या वतीने अँड.डी.एम. काजगुंडे यांनी काम पाहिले व त्यांना अॕड.बी. आय.चौधरी,अॕड.अक्षय इंगळे तसेच अॕड.अनिल राठोड यांनी मदत केली.



