शैक्षणिकसांस्कृतीक

बचपन बाल विद्या मंदिर येथे शिवजयंती उत्साहात साजरी,वेशभुषा करत बाल शिवाजी साकारले 

केज/प्रतिनिधी

दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी बचपन बाल विद्या मंदिर या शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी बाल विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज,जिजाऊ माता, मावळे अशा विविध वेशभूषेत सहभाग घेतला होता.

लहानग्यांनी शिव चरित्रावरील भाषणे,घोष वाक्ये तसेच देशभक्तीपर गीते सादर करून बाल शिवाजी साकारत उपस्थितांची मने जिंकली शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या शौर्य,पराक्रम व आदर्श नेतृत्वाबद्दल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यां मध्ये देशप्रेम,शौर्य व संस्कारांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला.संपूर्ण कार्यक्रम आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.यावेळी बचपन बाल विद्या मंदिर च्या संचालिका सौ. वैशाली कराड मॅडम, ज्ञानेश्वरी मॅडम,कीर्ती मॅडम यांच्या सह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!