
केज/प्रतिनिधी
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता. केज शाळेत संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करून अभिवादन केले.संत सेवालाल महाराज यांचा जन्म दि.१५ फेब्रुवारी १७३९ रोजी एक श्रीमंत घराण्यात झाला. वडील भीमा नाईक व आई धर्मली माता.संत सेवालाल यांचा जन्म श्रीमंत घराण्यात होऊन सुद्धा त्यांनी बंजारा समाज मागासलेला असून अशिक्षित आहे तसेच अंधश्रद्धा यांमध्ये आहे.यामधून बंजारा समाजास उपदेश करून त्यांना सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे या विचाराने संत सेवालाल महाराज यांनी कार्य केले.
अंधश्रध्दा नष्ट करणे,स्वच्छता, पशु संवर्धन आणि पाण्याचे महत्त्व तीनशे वर्षांपूर्वी त्यांनी भर दिला.त्यांनी नशेला दूर ठेवा आणि सुखी जीवन जगा असा संदेश दिला.स्त्रियांचा सन्मान करा,मुली जीवंत देवी आहेत असे सांगून महिला सक्षमीकरणाचा पाया रचला.तसेच तांड्यात शिक्षण व स्वच्छतेचा प्रसार केला. अशा या महान संत सेवालाल महाराज यांचा मृत्यू दि.४ डिसेंबर१८०६ रोजी झाला.त्यांची समाधी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आहे.असे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज या शाळेचे मुख्याध्यापक श्री राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
या शाळेचे प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री.डॉ. रामकिशन ग्यानबा मुळे सर व गणित विज्ञान विषयाचे प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री. संदीप मेघराज ठोंबरे सर, श्रीमती निलावती अनिलकुमार भोरे मॅडम, श्रीमती अंजली गोविंदराव उटीकर मॅडम, श्री.आकाश दत्तात्रय लोंढे सर,श्री.राहुल बजरंग बचुटे सर,श्री. आबासाहेब तुळशिराम धपाटे सर,ट्रेनी शिक्षिका रोहिणी श्रीधर काळे मॅडम यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.आकाश दत्तात्रय लोंढे सर यांनी केले व श्रीमती अंजली गोविंदराव उटीकर मॅडम यांनी आभार मानले.



