शैक्षणिकसांस्कृतीक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडशेत वस्ती शाळा उमरी केंद्र टाकळी शिवजयंती उत्साहात साजरी,जिल्हा परिषद शाळा वाचल्या पाहिजेत – प्रा.डाॕ.नवनाथ काशिद. तर शाळांनी घेतलेल्या उपक्रमाला सुद्धा सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे असे माझे प्रामाणिक मत आहे.

केज/प्रतिनिधी

दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडशेत वस्तीशाळा उमरी केंद्र टाकळी शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तर शाळांनी घेतलेल्या उपक्रमाला सुद्धा सर्वांनी सहकार्य करायलापाहिजे असे माझे प्रामाणिक मत आहे असे प्रा.डाॕ.नवनाथ काशिद सर यांनी सांगितले.शिवजयंती अनुषंगाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.छत्रपती शिवरायांचा इतिहास याविषयी श्री.फुलचंद घुले मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वड शेत वस्ती तालुका केज यांनी विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यानंतर शिवजयंती निमित्त स्वागतगीत,शिव जन्मोत्सवाचा पाळणा, शिवरायांच्या गुणगौरवा आधारित गीतावर विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य, पोवाडा सादरीकरण केले या कार्यक्रमास वड शेत वस्ती येथील ग्रामस्थ श्री.विश्वनाथ मुळे,श्री. दिगंबर मुळे,श्री.गणेश भैरट,श्री.आकाश भैरट, श्री.रामेश्वर मुळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. चंद्रशेखर मुळे,श्री.अशोक मुळे,श्री. नाना भैरट, श्री.विनायक मुळे,श्री.भगवान मुळे, श्री.हरिभाऊ मुळे,श्री. आश्रुबा मुळे, श्री.भोसले सर व अनेक माता पालक यांनी हजर राहून विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले. शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती सुवर्णा जगदाळे सह शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडशेत वस्ती उमरी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!