शैक्षणिक

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वक्तृत्वस्पर्धा संपन्न.   

केज/प्रतिनिधी

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची शाळेत छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंती निमित्त दि.१८ फेब्रुवारी २०२६ बुधवार रोजी राजमुद्रा विकास मंच कुंबेफळ ता.केज यांनी वक्त्रुत्व स्पर्धा आयोजित केल्या. यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या कार्यक्रमात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेतील इ.पहिली ते सातवी व सिध्दीविनायक विद्यालय कुंबेफळ या शाळेतील इयत्ता पाचवी वी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या स्पर्धे साठी इयत्ता पहिली ते चौथी,पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी असे गट होते.मान्यवरांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुंबेफळ ग्रामपंचायतचे सरपंच श्री.अविनाश दिनकर पांचाळ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.शालु विजय थोरात,प्रमुख पाहुणे डॉ. सौ.योगिनी ताई थोरात माजी जिल्हा परिषद सदस्या,उद्घाटक,श्री. सुरेश नाना थोरात, प्रकाश थोरात बंडु आबा शिक्षणप्रेमी नागरिक, मार्गदर्शक विष्णु आबा थोरात,किशोर तात्या थोरात,माजी सरपंच हे होते व या कार्यक्रमास उत्तेजन श्री.पांडुरंग थोरात लेखाधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी दिले.या स्पर्धेचे प्रथम, द्वितीय,तृतीय व प्रोत्साहनपर असे विजयी स्पर्धकांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास आपण छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या विचारांचा आपण आदर्श घेऊन आपण आपल्या जीवनात यशस्वी होणेसाठी सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे.असे आपल्या प्रास्ताविकात डॉ.सौ. योगिनीताई थोरात माजी जिल्हा परिषद सदस्या यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेतील इयत्ता सहावी तील विद्यार्थीनीकु.वैभवी दत्तात्रय घाडगे या विद्यार्थिनीने केले.शेवटी या शाळेतील प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री.डॉ. रामकिशन ग्यानबा मुळे सर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!