परळीत होणाऱ्या भव्य एल्गार महासभेस हजारोच्या संख्येने उपस्थित रहा – लिंबराज गायकवाड

केज/प्रतिनिधी
आपल्या न्याय्य हक्कासाठी,संघर्षासाठी सतत लढणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र,युवकांचे हृदयसम्राट सुजातदादा आंबेडकर पहिल्यांदाच परळी शहरात सोमवार दि.२९ सप्टेंबर रोजी आगमन करीत आहेत.
वंचित समाजाच्या आवाजाला बळ देणारा हा ऐतिहासिक क्षण ठरणार असून,त्यांच्या स्वागतासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य एल्गार महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या महासभेचे उद्घाटक युवा नेते प्रा.किसन चव्हाण राष्ट्रीय महासचिव असणार असून मार्गदर्शनासाठी फारूख अहमद राज्य उपाध्यक्ष,प्रवक्त्या सविताताई मुंडे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी शैलेश कांबळे बीड पूर्व जिल्हा अध्यक्ष, अजय सरवदे बीड पश्चिम जिल्हाध्यक्ष बाबुराव मस्के बीड पूर्व युवा जिल्हाध्यक्ष तर कार्यक्रम अध्यक्षपदी मिलिंद घाडगे बीड जिल्हा महासचिव उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थितीत खंडुनाना जाधव बीड जिल्हा पश्चिम महासचिव, प्रसन्नजीत रोडे बीड जिल्हा उपाध्यक्ष ,ॲड. संजय रोडे बीड जिल्हा सहसचिव, बालासाहेब जगतकर बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख ,सचिन उजगरे बीड जिल्हा उपाध्यक्ष धम्मानंद कासारे बीड हे नेते सहभागी होणार आहेत.
परळी शहरात होणाऱ्या भव्य एल्गार महासभेस हजारोच्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते लिंबराज गायकवाड यांनी केले आहे. सुजातदादा आंबेडकर यांच्या स्वागताला ऐतिहासिक रूप द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



