प्रशासकीय

अंबाजोगाई येथे तीन दिवसीय विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्ग संपन्न.

अंबाजोगाई/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे चे सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड,यांचे विद्यमाने अर्थवेल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंबाजोगाई यांचे सहकार्याने अंबाजोगाई येथे नागरी सहकारी बँका, पतसंस्था करिता विशेष वसुली अधिकारी तीन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले.

तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गात बीड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अभ्यासू तज्ञ व्याख्याते श्री.खोडसे सी. ए.प्रमाणित लेखापरीक्षक सहकारी संस्था बीड यांनी कर्ज वसुली संदर्भात १०१ कायदेशीर प्रकरणे,कर्ज वाटप करत असताना घ्यावयाची वैधानिक दक्षता,भविष्यात संस्था अडचणीत येणार नाही याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच वसुंधरा महिला नागरी सहकारी बँकेचे सीईओ जे.एस.शर्मा सहकार क्षेत्रातील कायदेशीर बाबी, नियम, कायदा, सविस्तर मार्गदर्शन केले, सहकार प्रशिक्षण केंद्र लातूरचे उपप्राचार्य एस. आर.कोळे यांनी सहकार कायदा, नियम या विषया वर सखोल मार्गदर्शन केले.समारोप समारंभास अर्थवेल नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक बाळासाहेब माने होते. उपस्थितांचे स्वागत व्यवस्थापक अंगद मस्के यांनी केले,कार्यक्रमाचे प्रस्ताविक सूत्रसंचालन आभार वर्ग संयोजक एस. आर.कोळी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!