ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या तीन दिवसीय प्रवचन मालेचे माजलगाव येथे आयोजन

माजलगाव/प्रतिनिधी
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्री संत धुंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान माजलगाव आणि राजस्थानी सेवा समाज माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ह.भ.प. गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या रसाळ वाणीतून तीन दिवसीय प्रवचन मालेचे आयोजन माजलगाव येथे करण्यात आले आहे.प्रवचन मालेचे हे सोळावे वर्ष आहे.
तर प्रवचनाचा विषय हरिपाठ हा असून या अमृतमय प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत धुंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान व राजस्थानी सेवा समाज माजलगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन शुद्ध तृतीया शके १९४७ अर्थात बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ ते शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी दररोज सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेमध्ये राजस्थानी मंगल कार्यालय माजलगाव येथे श्री संतज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ या विषयावर प्रवचन मालेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व भाविकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समिती च्या वतीने करण्यात आले आहे.



