सामाजिक

बीड जिल्ह्याच्या विकासा साठी सह्याद्रीवर खलबते आरोग्य,रस्ते आणि पर्यटनासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची आ. नमीताताई मुंदडा यांची मागणी

केज/प्रतिनिधी

मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे दि.१२ फेब्रुवारी गुरुवारी बीड जिल्हा नियोजनसमितीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्याचा प्रलंबित विकास आणि विविध लोकहितार्थ कामांसाठी निधीचा महापूर आणण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली.

बीडच्या आरोग्य यंत्रणेचा होणार कायापालट?

बीड जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणिआरोग्य सुविधांवरील ताण लक्षात घेता,बैठकीत आरोग्य विभागावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे: 

होळ,काळेगाव घाट, सोनीजवळा, बोरिसावरगाव,येवता आणि पाटोदा येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यासाठी प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवण्याची मागणी करण्यात आली.तसेच सासुरा,उमरी,भालगाव, कोरडेवाडी,आरणगाव यासह ११ गावांमध्ये नवीन आरोग्य उपकेंद्रे उभारण्याबाबत ठराव मांडण्यात आला.स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महा विद्यालय व जिल्हा रुग्णालय अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महा विद्यालयासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि औषध खरेदीसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली.

अंबाजोगाईत इको- टुरिझम आणि नवीन कारागृह, पर्यटन 

अंबाजोगाईच्या निसर्ग सौंदर्याला चालना देण्यासाठी तिथे इको- टुरिझम प्रकल्पासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे,ज्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सुरक्षा अंतर्गत गृह विभागा अंतर्गत अंबाजोगाई येथे नवीन कारागृहासाठी काळवटी शिवारात ३० एकर जागेवर संरक्षण भिंत उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीची तातडीने मागणी करण्यात आली.

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पायाभूत सुविधांचे पुनरुज्जीवन

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील रस्ते,पूल आणि जल संधारण प्रकल्पांचे प्रचंड नुकसान झाले आहे.या कामांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जल संधारण विभागाने युद्ध पातळीवर निधी उपलब्ध करून द्यावा,अशीभूमिका आ.नमीता मुंदडा यांच्या कडून बैठकीत मांडण्यात आली.प्रमुख उपस्थिती मध्ये ही बैठक बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या अध्यक्षते खाली आणि पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!