आहिल्यादेवी आश्रम शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न ; विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ह्या स्नेहसंमेलनाचे आयोजन एक सकारात्मक पाऊल – डॉ.देवराव चामणकर


केज/प्रतिनिधी
इतर मागास बहूजन कल्याण विभागा अंतर्गत आणि श्री.छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस संचलित अहिल्यादेवी प्राथमिक व उच्च प्राथमिक आश्रम शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन १० फेब्रुवारी रोजी शाळेच्या प्रांगणात अतिशय उत्साहात आयोजित करण्यात आले.या स्नेहसंमेलनात ज्ञान आणि कलेचा अविष्कार ह्या दोन प्रमुख गोष्टींवर विशेषभर देण्यात आला.स्नेहसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सचिन कस्तुरे,डॉ.देवराव चामणकर , डॉ.संदीप जैन, मा.मु.हंडीबाग सर,शाळेचे मुख्याध्यापक श्री.धेंडे सर थळकरी सर,पत्रकार विजय आरकडे,लाडेकर सर,पालक केकाण सर, नागरगोजे सर,नखाते सर यांची उपस्थिती होती.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. सोन्नर सर यांनी स्नेहसंमेलनाची प्रस्तावना केली.यावेळी त्यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांबद्दल तसेच शालेतील शिक्षण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाबद्दल सविस्तर माहिती दिली.प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे खूप कौतुक केले आणि शाळेतील विद्यार्थ्यांना या मंचावर आपले कला कौशल्य प्रकट करण्यासाठी दिलेल्या संधीसाठी शाळेचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांनी नृत्य,गायन, अभिनय,व इतर मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये आपल्या कला सादर केल्या आणि शाळेचा प्रत्येक कोपरा उत्साही वातावरणाने गाजला.आश्रम शाळेतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा महत्त्वपूर्ण कार्य प्रगतीसाठी चालू आहे, असे प्रमुख पाहुण्यांनी सांगितले.
शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भविष्या साठी ह्या स्नेहसंमेलनाचे आयोजन एक सकारात्मक पाऊल ठरले आहे.या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन पोटभरे सर यांनी केले तर स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.यावेळी परिसरातील नागरिक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.



