सामाजिक

स्थानिक तलाठी, मंडळाधिकारी यांच्या केज तालुक्याबाहेर बदल्या करा तसेच त्यांचा पदभार बाहेरील तलाठी, मंडळाधिकारी यांचेकडे द्या.! क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांची निवेदनाद्वारे मागणी .

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यात सध्या स्थानिक रहिवासी असलेले तलाठी(ग्राम महसूल अधिकारी), मंडळ अधिकारी महसूल मंडळात ,सज्जांवर शासकीय कर्तव्यावर असून त्यांच्याकडून दैनंदिन कामकाज करताना नेहमीच पक्षपातीपणा होत असल्याचे निदर्शनास येत आहे.ठराविक राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी हेतू परस्पर चुकीचे व भ्रष्ट काम करताना अनेकदा स्पष्ट झाले आहे.

यामुळे शेतकऱ्यांचे,सामान्य नागरिकांचे, पक्षकारांचे, कायदेशीर,सामाजिक, मानसिक,आर्थिक नुकसान होत असून यापुढे केज तालुक्यातील स्थानिक रहिवासी असणाऱ्या सर्वच ग्राम महसूल अधिकाऱ्यांची व मंडळाधिकाऱ्यांची केज तालुक्याबाहेर तात्काळ बदल्या कराव्यात तसेच त्यांच्याकडील सध्याचा पदभार उपलब्ध असणाऱ्या बाहेर जिल्ह्यातील रहिवासी असणारे ग्राममहसूल अधिकाऱ्यांकडे व मंडळाधिकारी यांचेकडे सोपवण्याची मागणी सोमवारी दि.९ फेब्रुवारी रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार केज यांच्याकडे केली आहे.

निवेदनात त्यांनी असे नमुद केले की,पुन्हा याच स्थानिक तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व मंडळाधिकारी यांचेकडे केज शहर,व केज तालुक्यातील ग्रामीण भागातील महसूल मंडळातील सज्जांचा पदभार दिला तर बीड जिल्हा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!