शैक्षणिक

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेत संत रविदास महाराज जयंती साजरी.     

केज/प्रतिनिधी

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज शाळेत संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करून अभिवादन केले.संत रविदास महाराज यांचा जन्म १३७६ सालामध्ये पोर्णिमेच्या दिवशी उत्तरप्रदेशात वाराणसी शहरातील गोवर्धनपुर मध्ये झाला.संत रविदास यांचा जन्म रविवारी झाल्याने त्यांचे नाव रविदास असे ठेवले. वडील संतोख दास व आईचे नाव कर्मादेवी होते.ते एक भारतीय महान संत,कवी व समाजसुधारक होते.

ते दयाळू व दानवीर होते. त्यांना संतशिरोमणी संत गुरु ही पदवी देण्यात आली.त्यांनी “मन चंगा तो कटौती में गंगा” यामधून ईश्वरभक्ती फक्त देखावा नसून मनातुन खरी भक्ती असावी व भक्तीमध्ये खरेपणा,प्रेम आणि सेवाभाव असावा असे सांगितले.त्यांनी जातीभेद व अस्पृश्यतेला विरोध केला व सामाजिक ऐक्य निर्माण केले.त्यांनी लोकांना खरी भक्ती व सद्मार्ग दाखवून भक्तीत बाहेरील अवडंबर नसावा असे सांगून आत्मज्ञान मार्ग दाखविला.त्यांनी भक्तीगीतातुन समाज प्रबोधन केले.असे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात सांगितले.

या शाळेतील प्राथमिक पदवीधर शिक्षक डॉ. रामकिशन ग्यानबा मुळे सर,गणित,विज्ञान विषयाचे प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री. संदीप मेघराज ठोंबरे सर, श्री.राहुल बजरंग बचुटे सर,श्री.आकाश दत्तात्रय लोंढे सर,श्री.आबासाहेब तुळशिराम धपाटे सर, श्रीमती अंजली गोविंदराव उटीकर मॅडम,श्रीमती निलावती अनिलकुमार भोरे मॅडम,ट्रेनी शिक्षिका रोहिणी श्रीधर काळे मॅडम यांनी विचार व्यक्त केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षण प्रेमी नागरिक,सर्व शिक्षक शिक्षिका वृंद,पीएम पोषण शक्ती निर्माण योजना कामगार स्वर्णमाला पवार,अनिता पवार,विद्यार्थी,विद्यार्थिंनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.राहुल बजरंग बचुटे सर यांनी केले व श्रीमती निलावती अनिलकुमार भोरे मॅडम यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!