केज शहरातील फूलेनगर येथे त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

केज/प्रतिनिधी
केज शहरातील महात्मा फुलेनगर येथे त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांची जयंती महिलांचे आरोग्य शिबीर घेऊन साजरी करण्यात आली.त्यागमूर्ती ज्या माऊलीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना घडविले अशा माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती शनिवारी म.फुले नगर,हाउसिंग कॉलनी येथे मोठ्या उत्साहात महिलांच्या विविध आरोग्य तपासण्या करून साजरी करण्यात आली.
प्रसंगी प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा डॉ.सीताताई बनसोड, उद्घाटक नगर सेविका पद्मिन अक्का शिंदे,महानंदाताई गायकवाड,प्रमिलाताई मस्के,प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थितीत डॉ. प्रमीता कांबळे,मनिषाताई घुले,कविताताई कराड, अँड.अनिताताई मुंडे, अनिताताई कांबळे, संगीताताई साळवे, शीतलताई लांडगे, प्रियंकाताई लांडगे, तस्लिमा इनामदार, प्रियंका सुमेध शिंदे, मंदाकिनी घाडगे मॅडम, शारदाताई गुंड,विमलताई जोगदंड,सारिकाताई शिंदे वर्षा राख,प्रियांका शिंदे सह महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.



