शैक्षणिकसामाजिक

आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धती मानवी आरोग्यासाठी महत्वाची –डॉ.देबश्री काकती प्रोफेसर विजय कोठेकर ज्ञानविज्ञान व्याख्यानमाला संपन्न

केज/प्रतिनिधी

प्रोफेसर विजय कोठेकर ज्ञानविज्ञानज्ञ व्याख्यान माला दि.७ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर संलग्नित, वनस्पतीशास्त्र विभाग,बाबुरावजी आडसकर महाविद्यालय, केज व श्रीमती केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालय,बीड,शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब जिल्हा धाराशिव,कै. शंकरराव गुट्टे ग्रामीण महाविद्यालय,धर्मापुरी तालुका परळी व वसंत दादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पाटोदा जिल्हा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान सहा दिवसीय आभाशी पद्धतीने घेण्यात आलेल्या व्याख्यानमालेचे सत्रसंपन्न झाले.

विज्ञान शाखेतील विद्यार्थी, संशोधकविद्यार्थी,प्राध्यापक , संशोधन मार्गदर्शक या सर्व घटकांना विज्ञानातील नवीन प्रवाह,नवनवीन संशोधन आणि संशोधना तील नवीन मार्ग या विषयीचे सखोल ज्ञान व्हावे याउद्देशाने वनस्पती शास्त्र विभागातर्फे प्रोफेसर विजय कोठेकर ज्ञानविज्ञान व्याख्यान माला २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानमालेचे उद्घाटन दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी डॉ.सरस श्रीवास्तव, दयानंद अँग्लो वैदिक महाविद्यालय, कानपूर उत्तर प्रदेश यांच्या उपस्थिती मध्ये व डॉ. इंद्राणी पॉल,जैवतंत्रज्ञान विभाग,ब्रेनवेल विद्यापीठ कोलकत्ता,पश्चिम बंगाल यांच्या अध्यक्षतेखाली आभासी पद्धतीने संपन्न झाले.

या ज्ञानविज्ञान व्याख्यानमालेच्या प्रथम सत्रामध्ये प्रमुख व्याख्याते डॉ.इंद्रायणी पाल मॅडम यांनी सूक्ष्मजीवांचे महत्त्व व मानवी दैनंदिन जीवना तील त्यांचा सहभाग, आर्थिक स्थैर्यासाठी परिणामकारक उपयुक्तता याविषयी आपले संशोधन विद्यार्थ्यांसमोर मांडले . यासत्राचे अध्यक्ष प्रोफेसर मुकुंद कुलथे सर विभाग प्रमुख वनस्पतीशास्त्र विभाग,मिलिंद विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर हे होते. व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्राचे प्रमुख वक्ते डॉ. शरद कांबळे,वनस्पती शास्त्र विभाग,के टी एच एम महाविद्यालय,नाशिक यांनी वनस्पतीचे वर्गीकरणशास्त्र याविषयी वनस्पतीच्या वर्गीकरणची गरज,सद्यपरिस्थितीमध्ये वनस्पतीचे महत्व व भविष्यकालीन संशोधना मध्ये वनस्पती वर्गीकरणाचे फायदे व त्यातून निर्माण होणाऱ्या नोकरीच्या संधी याविषयी आपले संशोधन विद्यार्थ्यां समोर विशद केले.या सत्राचेअध्यक्ष डॉ.शिवराम खडके,वनस्पतीशास्त्र विभाग,श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली हे होते.

ज्ञान विज्ञान व्याख्यानमालेच्या तिसऱ्या सत्राचे प्रमुख वक्ते प्रोफेसर हितेशकुमार सोलंकी,वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख गुजरात विद्यापीठ अहमदाबाद, यांनी पर्यावरणामधील जैवविविधता आणि जैवविविधता टिकवण्या साठीची आव्हाने व जबाबदारी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या सत्राचे अध्यक्ष प्रोफेसर दत्ता ढाले, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.पी.आर.घोगरे विज्ञान महाविद्यालय,धुळे हे होते.ज्ञानविज्ञान व्याख्यानमालेमध्ये चौथ्या सत्रात प्रमुख व्याख्याते डॉ.किरण जाधव,प्रमुख संशोधक,एकात्मिक शेती विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी एकात्मिक पद्धतीने केलेल्या शेतीचे स्वरूप त्याचे फायदे,शेती उत्पादनामधील वाढलेला खर्च कमी करण्याची पद्धत व कमी जागेमध्ये एकात्मिक पद्धतीने जास्तीत जास्त घ्यावयाची पिके यासंदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले.या सत्राचे अध्यक्ष प्रोफेसर लक्ष्मीकांत शिंदे प्राणिशास्त्र विभाग, जेईएस महाविद्यालय जालना हे होते.

या व्याख्यानमालेमध्ये पाचव्या सत्राच्या व्याख्यात्या डॉ.देबश्री काकती वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख,मंगलदाय महाविद्यालय,दरंग, आसाम यांनी आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय औषधी पद्धती याविषयी चे महत्त्व विशद करून, वनस्पतीचा मानवाच्या दैनंदिन आयुष्यातील औषधी म्हणून होणारा उपयोग त्याचे वास्तव व सत्य याविषयीची मांडणी केली,या सत्राच्या अध्यक्षा डॉ.पूजा सूर्यवंशी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख बूमरेड्डी महाविद्यालय,बिदर कर्नाटक या होत्या. प्रोफेसर विजय कोठेकर ज्ञानविज्ञान व्याख्यानमाले चे सहावे व शेवटचे सत्राचे प्रमुख व्याख्याते प्रोफेसर नितीन लभाने, वनस्पती शास्त्रविभाग,भवनविज्ञान महाविद्यालय, अंधेरी मुंबई यांनी वनस्पतीच्या जैव विविधतेमध्ये बियांच्या गर्भावस्थेतील होणारे बदल त्यासाठीचे परिणामकारक ठरणारे जैविक घटक व त्यातून निर्माण होणारी जैव विविधता याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.

या सत्राचे अध्यक्ष प्रोफेसर अनिल भुक्तार, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख,विवेकानंद विज्ञान महाविद्यालय,छत्रपती संभाजीनगर हे होते.प्रोफेसर विजय कोठेकर ज्ञान विज्ञान व्याख्यान माला २०२६ चा समारोप दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी आभासी पद्धतीने संपन्न झाला.यासमारंभाचे अध्यक्ष प्रोफेसर नितीन लभाने यांनी या प्रकारच्या ज्ञानविज्ञानावर आधारित व्याख्यानमाला भविष्यात विद्यार्थी व संशोधनासाठी होणे गरजेचे आहे. याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रोफेसर अनिल भूक्तार यांनी ज्ञानविज्ञानातील व्याख्यानमालेतून भविष्यकालीन नवीन संशोधक घडावेत अशा अपेक्षा व्यक्त केल्या. प्रोफेसर विजय कोठेकर ज्ञान विज्ञान व्याख्यान माला २०२६ चे मुख्य संयोजक प्रोफेसर नवनाथ काशीद,वनस्पतीशास्त्र विभाग,बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज यांनी या व्याख्यान मालेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केल्याबद्दल श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडसचे सचिव श्री रमेशरावजी आडसकर साहेब तसेच तज्ञ संचालिका श्रीमती अर्चनाताई आडसकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधवराव फावडे यांचे आभार व्यक्त केले.

व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी सहयोगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर, डॉ.ताराचंद होळंबे,डॉ. हेमंत भगवान,डॉ. बळीराम राख तसेच सहसंयोजक प्रोफेसर संतोष तळेकर,प्रोफेसर ज्योती क्षीरसागर, प्रोफेसर संध्या जोगदंड, प्रोफेसर गणेश पाचकोरे, प्रोफेसर अनिता धारासुरकर,डॉ.प्रकाश देशमुख,डॉ.शीला शिंदे, डॉ.शंकर सानप,डॉ. बाबासाहेब हिरवे,डॉ. श्रीकांत भोसले,श्रीमती अर्चना मुखेडकर,डॉ. विश्वजीत म्हस्के व सहयोगी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करून पुढील शैक्षणिक शैक्षणिक वर्षांमध्ये ज्ञान विज्ञान व्याख्यानमाला यशस्वीपणे घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!