सामाजिक

शेतीनिष्ठ शेतकरी कै. नारायण आबा शिंदे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त होळ येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील होळ येथील शेतीनिष्ठ शेतकरी कै.नारायणराव व्यंकटराव शिंदे (आबा) यांच्या पुण्य स्मरणानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, होळ वस्ती साठे नगर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचेवाटप करण्यात आले.हा उपक्रम कै. नारायण आबा शिंदे यांचे नातू अॕड.राजेश भैय्या शिंदे यांच्या पुढाकारातून पार पडला.

कै.नारायण आबा शिंदे यांनी आयुष्य भर शेतीत काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत पुढील पिढीला शिक्षणाच्या प्रवाहात आणले.त्यांच्या याच संस्कारांना स्मरून आजोबांच्या पुण्यस्मरणा निमित्त समाजासाठी काहीतरी करण्याची सामाजिक बांधिलकी आपण स्वीकारल्याचे मत यावेळी अॕड.राजेश भैय्या शिंदे यांनी व्यक्त केले. आजोबांच्या कष्टामुळेच आम्हाला उच्च शिक्षणाची संधी मिळाली असून, त्या ऋणाची परतफेड समाज कार्याच्या माध्यमातून करणे हेच आमचे कर्तव्य आहे,असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास त्यांचे बंधू प्रेम भैय्या शिंदे,शाळेतील शिक्षक ओव्हाळ सर, इंगळे मॅडम तसेचविद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.हा उपक्रम केवळ पुण्य स्मरणापुरताच मर्यादित न राहता शिक्षण,सामाजिक भान आणि मूल्यांची जपणूक करणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कै.नारायण आबा शिंदे यांच्या स्मृतीस अशा समाजोपयोगी कार्यातून दिलेली मानवंदना सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!