वैज्ञानिकशैक्षणिक

जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला 

केज/प्रतिनिधी

दि. 24 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षणाधिकारी व विभागीय समन्वयक, राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव नेहरूविज्ञान केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात साने गुरुजी निवासी विद्यालयाने सतत पाच वर्षापासून जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरा पर्यंत मजल मारली असून यावर्षी जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे व यशाची परंपरा कायम ठेवली आहे.बीड येथे आयोजित स्पर्धेत या विद्यालयाने॓ मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य विषयांतर्गत स्मार्ट शेती या उप विषयांतर्गत तंत्रज्ञानाच्या शिवारात या नाटिकेने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

या नाटकात केंद्रे अंजली,गोरे सोनाली, चौरे गीतांजली,चौरे स्वाती,चौरे प्रतीक्षा, राठोड करण,राऊत स्वप्निल,फड नाथ या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता तर या नाटकाचे लेखन कु. साक्षी कराड यांनी तर दिग्दर्शन प्रा.डॉ.कविता गिते मॅडम,नैपथ्य जाधवर सर, लाइटिंग व ध्वनी श्री दस्तुरे सर, वेशभूषा श्रीमती शेख व जोशी मॅडम यांनी केली होती.यायशस्वी परंपरे साठी शाळेच्या व संस्थेच्या वतीने संस्था अध्यक्ष अँड.उद्धवराव कराड साहेब,श्री कापसे सर,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!