पवित्र रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर केजमध्ये एम आय एम आक्रमक ; नगर पंचायत आणि महावितरणला मागण्यांचे निवेदन सादर

केज/प्रतिनिधी
मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.या काळात मुस्लिम बांधवांना मूलभूत सुविधांची कमतरता भासू नये, यासाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) केज शहराच्या वतीने आज प्रशासनाला धारेवर धरत विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.प्रशासनाकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत.रमजान च्या काळात शहर वासीयांना त्रास होऊ नये,यासाठी शहराध्यक्ष तालेब इनामदार यांच्या नेतृत्वाखाली शिष्ट मंडळाने नगर पंचायत आणि महावितरण कार्यालयात खालील मागण्या मांडल्या.
स्वच्छता व पाणीपुरवठा
केज शहरातील सर्व प्रभागांमध्ये विशेषतः मशिदींच्या परिसरात नियमित स्वच्छता राखावी आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा.प्रकाश व्यवस्था रात्रीच्या वेळी नागरिकांची ये-जा वाढते,त्यामुळे पथदिवे (Street Lights) तातडीने दुरुस्त करून सर्वत्र प्रकाश व्यवस्था चोख ठेवावी.अखंडित वीजपुरवठा सहरी आणि इफ्तारच्या वेळी कोणतीही वीज कपात करू नये.महावितरणने तांत्रिक बिघाड टाळून अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा.
रमजान हा इबादत आणि पवित्रतेचा महिना आहे. या काळात नागरिकांना पाणी,वीज किंवा अस्वच्छतेमुळे कोणतीही अडचण निर्माण होऊ नये,ही प्रशासनाची जबाबदारी आहे.जर प्रशासनाने यात दिरंगाई केली,तर एमआयएम स्टाईलने जाब विचारला जाईल.
— तालेब इनामदार (शहराध्यक्ष, AIMIM केज)
यांची होती उपस्थिती
यावेळी तालेब इनामदार यांच्यासह शाकेर कुरेशी, अजिम सय्यद,फारोज पठाण,रईस शेख,फरीद इनामदार,नाजेम शेख व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने या मागण्यां कडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.आता यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते,याकडे शहर वासीयांचे लक्ष लागले आहे.



