महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी केज मध्ये निषेध व्यक्त करून महात्मा फुले युवा दलाच्या वतीने अमित शहा यांना निवेदन दोषींवर कठोर कारवाई ची केली मागणी

केज/प्रतिनिधी
तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्हापूर येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ महात्मा फुले युवा दलाच्या वतीने तहसीलदाराच्या मार्फत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन देऊन दोषीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली 7 फेब्रुवारी 2026 रोजी समाजकंटकाने हे निंदनीय कृती केले ज्या महामानवाने शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली स्त्री पुरुष समानता आणि सत्यशोधक विचाराचा प्रसार केला त्यांचा पुतळा पाडून त्यांचे विचार नष्ट होऊ शकत नाहीत असा संताप व्यक्त करण्यात आला.
या घटनेमुळे शिव – शाहू – फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत तेलंगणा सरकारने या प्रकरणात लक्ष घालून दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे तसेच महाराष्ट्राचे मुख्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा निवेदन पाठवून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी महात्मा फुले युवा दल केज तालुका प्रमुख विश्वास राऊत तसेच धनराज लाटे,सरपंचपती नंदूलाल मिसाळ,संतोष सत्वधर, रामेश्वर राऊत,दादासाहेब बिक्कड,सचिन राऊत, पत्रकार विजय बिक्कड, पांडुरंग कसबे यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



