शैक्षणिक

साने गुरुजी निवासी विद्यालय केजच्या दोन विद्यार्थ्यांची इस्रो दौऱ्यासाठी निवड

केज/प्रतिनिधी

केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालय केज शाळेतील कु.कांबळे ज्ञानेश्वरी धनंजय व चि. गणेशकर शिवराज लक्ष्मण या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय निवड परिक्षेत घवघवीत यश संपादन केले असून त्यांची इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) च्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.या अभ्यास दौऱ्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत संपूर्ण राज्यातून १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

यात साने गुरुजी निवासी विद्यालय केजचे दोन विद्यार्थी आहे.इस्रोच्या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांना उपग्रह तंत्रज्ञान,अंतराळ संशोधन,राॕकेट प्रक्षेपण प्रक्रिया तसेच वैज्ञानिक प्रयोगशाळांची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अँड. उद्धवराव कराड सर, उपाध्यक्ष राजेश कापसे सर,संकुलाच्या प्राचार्या डॉ.कविता गित्ते-कराड मॅडम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!