कृषीसामाजिक

केज येथे भव्य ग्रामीण कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी,शालेय विद्यार्थी यांच्या भेटी, महिलांची कृषी प्रदर्शनात लक्षणीय उपस्थिती

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील कृषिधन ,शिंजीर मिल्क ॲण्ड ॲग्रो प्रोडयुसर कंपनी केज यांच्या वतीने दि.७ ते ९ हे तीन दिवसीय कृषी प्रदर्शन विठाई मंगल कार्यालय येथे सुरू आहे.

दुसऱ्या दिवशी कृषी प्रदर्शनात मोठ्या संख्येने व्यावसायिक शेतकरी, विद्यार्थी कृषी प्रदर्शन पाहण्यास आले होते. चाईल्ड प्रायमरी स्कूल, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.दुसऱ्या दिवशी शाश्वत शेती या विषयावर  विनायक पोळ यांचे व्याख्यान संपन्न झाले.

यावेळी प्रमुख उपस्थिती प्रा.डॉ.मनोज निगडकर, विकास मिरगणे,डॉ. हनुमंत सौदागर,चाईल्ड प्रायमरी इंग्लिश स्कुलचे शरद गिराम,कंपनीचे संचालक विशाल चौरे, आश्रूबा गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी विनायक पोळ म्हणाले की,शेतकऱ्यांनी शाश्वत शेती साठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागेल मातीचे आरोग्य सुधारले तरच उत्पादन वाढेल.महिला शेतकऱ्यांनी पुढे येऊन पुढे येऊन नवीन प्रयोग करावे लागतील.जैविक शेती काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

प्रास्ताविक डॉ.मनोज निगडकर यांनी करतांना मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे केज येथे होत असलेले हे कृषी प्रदर्शन याभागातील शेतकरी आणि व्यावसायिकांना वरदान ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.आभार सोनिया चौरे यांनी मानले.

याप्रदर्शनात महाराष्ट्रातील शेतीशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान,पाणी व्यवस्थापन,पिक व्यवस्थापन या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. केज तालुक्यात पहिल्यांदाच कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांनी,शेतकरी गटांनी कृषी प्रदर्शनास भेटी दिल्या.

या प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीतील नवीन तंत्रज्ञान, सेंद्रिय शेतीचे महत्त्व, ठिबक सिंचन पद्धत, ड्रोन फवारणी,ऊस,सोयाबीन, भात,डाळी इत्यादी पिकांची सुधारित वाण यांची माहिती देण्यात आली. तसेच विविध कृषी यंत्रसामग्री,खत,बियाणे आणि कीड नियंत्रणाचे उपाय यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. अनेक शेतकरी या प्रदर्शनाला भेट देऊन मार्गदर्शन घेत होते.

महिलांसाठी विशेष स्वयं सहायता गटांचे स्टॉल लावण्यात आले होते, ज्यामध्ये घरगुती उद्योग, दुग्धव्यवसाय,शेळीपालन, कुक्कुटपालन इत्यादी विषयांवर माहिती दिली गेली.विद्यार्थ्यांसाठी कृषी मार्गदर्शन सत्रही घेण्यात आले.दुसऱ्या दिवशी संचालक (वैद्यकीय) राज्य कामगार विमा योजना मुंबई डॉ.अशोक थोरात,माजी सभापती दादासाहेब ससाणे यांच्या सह परिसरातील विविध गावातील सरपंच प्रयोग शील शेतकरी यांनीही कृषी प्रदर्शनास भेटी दिल्या.या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या तंत्रज्ञाना विषयी उत्सुकता निर्माण झाली असल्याचे दिसून आले.

शिंजीर मिल्क ॲण्ड ॲग्रो प्रोडयुसर कंपनीने पुढाकार घेत या कृषी प्रदर्शनाचे आयेाजन केले आहे.यामुळे केज तालुक्यातील तसेच बीड जिल्हयातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानसमजून घेण्यासाठी येत आहेत प्रदर्शनामध्ये प्रगत शेती मशिनरी,आधुनिक साधने सुधारीत बीयाणे,खते, किटकनाशके,दुग्ध व्यवसाय या विषयी थेट प्रात्यक्षीके आहेत.हे प्रदर्शन शेतकरी, व्यापारी, विक्रेते, वैज्ञानिक, विदयार्थी यांच्यासाठी एकव्यासपीठ म्हणुन उपलब्ध आहे.

ड्रोन प्रात्यक्षिक,ग्राम संस्कृती देखावा ठरले प्रमुख आकर्षण

कृषी प्रदर्शनात ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक व ग्राम संस्कृती तयार करण्यात आलेला जिवंत देखावा हे कृषी प्रदर्शना तील महत्त्वाचे आकर्षण ठरले या भोवती अनेक विद्यार्थी शेतकरी जिज्ञासु पणे निरीक्षण करताना दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!