अध्यात्मिक

भगवान श्रीकृष्ण आश्रम येथे रामकथा व महा विष्णु याग मंडपाचे संत महंत व भाविक भक्तांनी केले पुजन,मंडप उभारणी साठी १ महीना लागणार, राजस्थानातील कारागीर दाखल 

केज/प्रतिनिधी

केज शहरातील बीड रोड वरील भगवान श्रीकृष्ण आश्रम येथे रामकथा व महा विष्णु याग मंडपाचे संत,महंत व भाविक भक्तांनी दि.२ फेब्रुवारी सोमवार रोजी पुजन केले, मंडप उभारणी साठी १ महीण्याचा कालावधी लागणार असुन राजस्थान येथील कारागीर दाखल झाले आहेत.

यावेळी धर्म ध्वजारोहण करण्यात आले असुन पुरोहित श्री.रमेशराव कुलकर्णी तांबवेकर गुरुजी यांनी मंत्रोच्चाराच्या घोषात पुजन करण्यात आले. यावेळी साधना स्थली लाडे वडगाव येथील स्वामीजी ह.भ.प.श्री. भारतानंद सरस्वतीजी, भागवत भुषण ह.भ.प. केशव महाराज शास्त्री, ह.भ.प.विष्णु महाराज शास्त्री यांच्या सह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुजना नंतर पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मंत्रांच्या जय घोषात भक्तांनी श्रीफळ वाढवून मंडप उभारणीचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी ह.भ.प.स्वामी भारतानंदजी सरस्वती यांनी आशिर्वादपर मार्गदर्शन केले.यामध्ये त्यांनी भागवत भुषण ह.भ.प.केशव महाराज शास्त्री यांचा हेतु प्रांजळ असुन तो सिद्धीस जाणार आहे.समाजातील गोर गरीब,शोषित,वंचीत, दिव्यांग बांधवांना दरवर्षी गरीबांची दिवाळी साजरी करुन त्यांना जीवनासाठी आवश्यक साहित्याचे वाटप करून गोडधोड भोजन देऊन दिवाळी सण साजरा केला जातो.

सर्व भाविक भक्तांनी सढळ हातांनी सहकार्य करावे व रामकथा व महा विष्णु यागामध्ये सहभागी व्हावे व भव्यदिव्य भगवान श्रीकृष्ण मंदिर उभारणीच्या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन केले. महाप्रसाद घेऊन हा कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!