बुलढाणा अर्बन को -ऑप क्रेडीट सोसायटी कडून पत्रकारितेचा सन्मान ; केजचे पत्रकार प्रदिप गायकवाड यांचा विशेष सत्कार संपन्न

केज/प्रतिनिधी
बुलढाणा अर्बन को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल केज येथील पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केजचे उपाध्यक्ष श्री.प्रदिप गायकवाड यांना विशेष ‘सन्मानचिन्ह’ देऊन गौरविण्यात आले.त्या अनुषंगाने जालना येथे सामाजिक क्षेत्रातील पत्रकारितेतील अशा विविध कामांबद्दल गुण गौरव बुलढाणा अर्बन को-आॕपक्रेडीट सोसायटी च्या वतीने आयोजित केला होता.
एका विशेष कार्यक्रमात हा गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी “बुलढाणा अर्बन ला समर्थ साथ…!” अशा शब्दांत गायकवाड यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.संस्थेचे संस्थापक आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.यावेळी बुलढाणा अर्बन को- आॕप क्रेडीट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री. राधेश्यामजी चांडक, विद्यमान अध्यक्ष श्री.डॉ. सुकेशजी झंवर आणि बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा सौ.कोमलताई झंवर यांनी श्री.प्रदीप गायकवाड यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. “बुलढाणा अर्बन को-आॕप क्रेडीट सोसायटी आपली सदैव ऋणी राहील,” अशा भावना यावेळी संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.
प्रदीप गायकवाड यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.प्रदिप गायकवाड यांनी आपल्या लेखणी च्या माध्यमातून केज परिसरातील विविध प्रश्न मांडण्या सोबतच सामाजिक संस्थांच्या कार्याला नेहमीच प्रसिद्धी दिली आहे.त्यांच्या या कार्याची दखल राज्याची नामांकित संस्था असलेल्या बुलढाणा अर्बन को-आॕप क्रेडीट सोसायटीने घेतल्याबद्दल पत्रकार बांधव,सामाजिक कार्यकर्ते आणि केज शहरामधील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



