वीस विजेच्या पोलवरील सव्वा पाच लाखाच्या विद्युत तारेची चोरी,केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील गप्पेवाडी ते घाटेवाडी रस्त्यावरील नामेवाडी शिवांरातील बाळूमामा मंदिरापासून घाटेवाडी पर्यंतच्या वीस विद्युत पोलवरील अॕल्युमिनियम ची ५ लाख २५ हजार रुपये किंमतीची तार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या प्रकरणी महावितरणचे गुत्तेदार संतोष चंदर मुरकुटे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध केज पोलिसात गुरूवारी गून्हा नोंद झाला आहे.
बुधवार दि.४ मार्च रोजी सकाळी साडे आठ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात आरोपीनी नामेवाडी,गप्पेवाडी आणि घाटेवाडी शिवारातील दोन ते अडीच किलो मीटर अंतरातील रस्त्याच्या लगत उभारण्यात आलेल्या वीस लोखंडी विद्युत पोलवरील अॕल्युमिनियम लिमिटेड कंपनीची ५ लाख २५ हजार रुपये किंमतीची तार कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्या प्रकरणी महावितरणचे गुत्तेदार संतोष चंदर मुरकुटे यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलिसात गून्हा नोंद झाला असून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक उमेश निकम हे पुढील तपास करीत आहेत.

