जे.एस.पी.एम.राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पॉलीटेक्निक ताथवडे, पुणे येथे नॅशनल स्टॉक एक्सचेंज(एन.एस.इ.) मार्फत एक दिवसीय स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम संपन्न

पुणे/प्रतिनिधी
दिनांक 08 ऑगस्ट 2025 रोजी जे.एस.पी. एम राजश्रीशाहू कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पॉलीटेक्निक ताथवडे, पुणे येथे भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड अर्थात (सेबी) तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज(एन.एस.इ.) च्या माध्यमातून पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. सरिता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून(सेबी) तसेच एन.एस.इ.चे सेक्युरिटीज मार्केट ट्रेनर श्री.गणेश चौधरी सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाचे मार्गदर्शन केले.यात त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेत तसेच पोस्ट ऑफिसमध्ये असलेल्या विविध योजना,डिमॅट अकाउंट,शेअर मार्केट, म्युच्युअल फंड व इतर शासकीय योजनांचे मार्गदर्शन केले.तसेच गुंतवणूक करत असताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी व फसवणूक करणाऱ्या योजनांपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व विभाग प्रमुख प्रा.मोरे लीना मॅडम,प्रा.ए.एन. डुबे मॅडम,प्रा.विद्या ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतकार्यक्रमाचे आयोजन,नियोजन तसेच सूत्र संचालन केले.या कार्यक्रमास कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



