शैक्षणिक

संत तुकाराम प्राथमिक विद्यालयाचे प्रांगण आनंद नगरीने बहरले – बबनराव आंधळे

बीड /प्रतिनिधी

अरुणा असफ अली महिला मंडळ बीड संचलित,संत तुकाराम प्राथमिक विद्यालय, तेलगाव रोड,बीड येथे विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढण्यासाठी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी विविध उपक्रमाचा एक भाग म्हणून शाळेत आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले.यामध्ये

खाद्यपदार्थाची खरेदी विक्री करणाऱ्या विद्यार्थी व पालकाच्या गर्दीने,संत तुकाराम प्राथमिक विद्यालयाचे प्रांगण बहरून गेले या आनंद नगरीचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री. बबनराव आंधळे सर व सामाजिक कार्यकर्ते सादेक भाई यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून युनूसभाई, एजाज भाई,सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.अंकुश चव्हाण सर हे उपस्थित होते मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि आनंद मेळाव्यासाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या आणि त्यांनी बनवलेल्या विविध पदार्थाचा यथोचित रित्या आस्वाद देखील घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनीबनवून आणलेले विविध पदार्थ आपापल्या स्टॉलवर मांडून त्याला नाव देऊन आकर्षकपणे सजवले होते.

ग्राहकांना आपले पदार्थ विकत घेण्यास आग्रह केला आणि मेहनत करून खरी कमाई करण्याचा आनंद मिळवला इतर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सुद्धा आपापल्या आवडीचे पदार्थ खरेदी करून त्यावर यथोचितरित्या ताव मारला यात झुणका भाकरी,तिखट पुरी,चिंचा, किराणा,भाजीपाला, इडली,डोसा,पाणीपुरी, चहा,दाबेली,दही धपाटे, भेळ, पॅटीस, आप्पे,रसना, मोसंबी,केळी या चटकदार पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी परिसरातील लोकांनी देखील गर्दी केली होती. अशा सुंदर आणि बहारदार कार्यक्रमाचे नियोजन करून यशस्वी करण्यात शाळेचे सर्व शिक्षक यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!