क्रिडाशैक्षणिक

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

केज/प्रतिनिधी

केज शहरातील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जीवन विकास शिक्षण मंडळाचे सचिव श्री.जी.बी.गदळे सर यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यकमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री.गणेश कोकीळ सर होते.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती शैलजा इंगळे मॅडम या उपस्थित होत्या.यावेळी या सर्वाच्या उपस्थिती मध्ये ध्वजारोहन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले,नेताजी सुभाषचंद्र बोस या गटा तील विद्यार्थीनी पथ संचलन व प्रमुख पाहुणे यांना सलामी दिली.या वेळी विद्यार्थ्यांना खेळाची शपथ देण्यात आली.

या स्पर्धेत रोप जंम्प, बुध्दीबळ,योगा,गोळाफेक,बॅडमिंटन या वैयक्तिक स्पर्धेचा समावेशकरण्यात आला.व सांघीक स्पर्धेत कब्बडी,खो खो या खेळाचा समावेश करण्यात आला होता.या कार्यक्रमाला श्री.जी.बी.गदळे सर यांनी मार्गदर्शन करताना शाळेचे खेळाडू राज्य राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व्हावे अशी आशा व्यक्त केली.या कार्यक्रमात विविध तालुका स्तर व जिल्हास्तरीय खेळाडूंना प्रशस्तीपत्र व मेडल देण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कदम सर यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.विनोद गुंड यांनी केले या स्पर्धा दि.२२जानेवारी व २४ जानेवारी दिवशी घेण्यात आल्या.या स्पर्धा प्रचंड खेळमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या आहेत.या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण संस्थेचे अध्यक्ष श्री.अंकुशराव इंगळे व स्कूलचे मुख्याध्यापक श्री.गणेश कोकीळ सर यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांचा सत्कार श्री. विनोद गुंड सर यांनी केला.यावेळी विजयी संघाना कप व मेडल देण्यात आले.या क्रीडा महोत्सवासाठी श्री.कदम सर,श्री.तांदळे सर,मैंंदसर, सौ.नाईकवाडे मॅडम,सौ. कल्याणकर मॅडम,सौ. विटेकर मॅडम,सौ.लोखंडे मॅडम,सौ.काळे मॅडम, थोरात मॅडम,सौ.ठोंबरे मॅडम,सौ.कापसे मॅडम, सौ.स्वंराजली मॅडम,सौ. सावंत मॅडम,सौ.राऊत मॅडम,सौ.जाधव मॅडम, महाजन मॅडम,शिक्षक व शिक्षका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या स्पर्धे साठी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!