
केज/प्रतिनिधी
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेत स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यांचा जन्म दि.१८ मार्च १५९४ रोजी झाला.त्यांचे वडील मालोजीराजे भोसले व आईचे नाव उमाबाई भोसले होते.ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचे वडील होते. ते एक पराक्रमी सेनापती, दूरदृष्टीचै राजकारणी व स्वराज्याचे संकल्पक होते.राजमाता मॉंसाहेब जिजाऊ यांच्याशी त्यांच्या विवाहानंतर त्यांनी स्वराज्याची पायाभरणी केली.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करुन मराठी साम्राज्याचा विस्तार केला.
शहाजी राजे भोसले ते केवळ एक शूर योद्धेच नव्हते तर ते दूरदृष्टी असलेले शासकही होते. त्यांचा मृत्यू दि.२३ जानेवारी १६६४ रोजी झाला.अशी माहिती देण्यात आली.यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका वृंद,पिएम पोषण शक्ती निर्माण योजना कामगार स्वर्णमाला पवार व अनिता पवार,विद्यार्थी, विद्यार्थिंनी तसेच गावकरी उपस्थित होते.



