केज शहरामध्ये आज पासुन श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन,भागवत भुषण ह.भ.प. केशव महाराज शास्त्री यांच्या ओजस्वी वाणीतून कथा

केज/प्रतिनिधी
केज शहरातील पंचायत समिती प्रांगणात भक्तीमय वातावरणात श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.भगवान श्रीकृष्ण आश्रम भक्त परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा भव्य धार्मिक सोहळा सोमवार दि.२६ जानेवारी २०२६ ते रविवार दि.०१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. दररोज दुपारी ३-०० ते सायंकाळी ५-०० वाजे पर्यंत श्रीमद भागवत कथेचे रसाळ कथनहोणार असून,या ज्ञानयज्ञाचे प्रवचन श्री.ह.भ.प. भागवत भूषण केशव महाराज शास्त्री संस्थापक अध्यक्ष भगवान श्रीकृष्ण आश्रम,केज यांच्या श्री मुखातून होणार आहे.
हा धार्मिक कार्यक्रम पंचायत समिती प्रांगण, केज ता.केज, जि.बीड येथे आयोजित करण्यात आला आहे.श्रीमदभागवत कथेच्या माध्यमातून भक्तांना अध्यात्मिक ज्ञान, संस्कार व भक्तीचा अमृतानुभव मिळणार असून परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.या ज्ञानयज्ञामुळे केज शहरासह परिसरात भक्ती,श्रद्धा व अध्यात्मिक वातावरण निर्माण होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.



