जिवाची वाडी येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील जीवाची वाडी येथील विविध संस्था,शाळा, ग्रंथालय येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला तसेच युनानी दवाखाना,जीवाची वाडी येथील तिरंगा ध्वज सैनीक,सतीष चौरे यांच्या हस्ते फडकवला यावेळी आरोग्य कर्मचारी श्रीमती सुरेखा सानप व श्रीमती वर्षा गव्हाणे या उपस्थित होत्या.पशुवैद्यकीय दवाखाना येथे ध्वजारोहण संस्थाप्रमुख शिध्देश्वर रासवे,यांच्या हस्ते संपन्न झाले.कै. श्रीरंगदासजी भुतडा सार्वजनिक ग्रामीण ग्रंथालय ध्वजारोहण मुख्याधापक अंकुश मोराळे यांच्या हस्ते संपन्न झाले,यावेळी संस्थापक अध्यक्ष गोकुळ सारूक, ग्रंथपाल सुभाष सारूक, शोभाताई चौरे, वाचक, विद्यार्थी,ग्रामस्थ इत्यादी मोठ्या संखेने उपस्थित होते.जि.प.प्रा. शा . हनुमानवस्ती येथे ध्वजारोहण मुख्याधापक,गोकुळ सारूक यांच्या हस्ते संपन्न झाले,यावेळी अंगणवाडी महिला कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
जि.प.उच्च प्राथमिक शाळा जिवाची वाडी ध्वजारोहण सैनीक सतीश चौरे यांच्या हस्ते संपन्न झाले शाळेतील विविध कलागुण विद्यार्थ्यांनी पालकांसमोर सादर केल्याने सर्व स्तरा तून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय जीवाचीवाडी येथील ध्वजारोहण गावच्या प्रथम नागरीक तथा माहिला सरपंच श्रीमती प्रेरणा काळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.यावेळी शालेय विद्यार्थी, अंगणवाडी महीला कर्मचारी,ग्रामपंचायत कर्मचारी,पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



