शैक्षणिक

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी 

केज/प्रतिनिधी

दि.२३ जानेवारी रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करून अभिवादन करण्यात आले.प्रास्ताविक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची या शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी केले.त्यांचे नाव बाळासाहेब केशव ठाकरे असे होते. त्यांचा जन्म दि.२३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला.ते मूळ व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध होते.त्यांनी १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना केली.

सामना वृत्तपत्रातून आपल्या विचारांचा प्रसार केला.ते हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखले जाऊ लागले.मराठी अस्मिता व हिंदुत्वाच्या मुद्द्यावरत्यांनी जोर दिला.आपल्या ठाम आणि बेधडक वक्तृत्वा मुळे ते जनमानसात लोकप्रिय झाले.त्यांचा मृत्यू दि.१७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाला.अशी माहिती आपल्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी सांगितले.

प्राथमिक पदवीधर शिक्षक डॉ. रामकिशन ग्यानबा मुळे सर,गणित व विज्ञान विषयाचे प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री. संदीप मेघराज ठोंबरे सर, आकाश दत्तात्रय लोंढे सर,राहुल बजरंग बचुटे सर,श्री.आबासाहेब तुळशिराम धपाटे सर, श्रीमती अंजली गोविंदराव उटीकर मॅडम,श्रीमती निलावती अनिलकुमार भोरे मॅडम,ट्रेनी शिक्षिका रोहिणी श्रीधर काळे मॅडम यांनी सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमास सर्व शिक्षक,शिक्षिका वृंद, पिएम पोषण आहार योजना कामगार स्वर्णमाला पवार,अनिता पवार,विद्यार्थी,विद्यार्थिंनी शिक्षणप्रेमी नागरिक, अंगणवाडी ताई,मदतनिस हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.संदीप मेघराज ठोंबरे सर यांनी केले व श्रीमती निलावती अनिलकुमार भोरे मॅडम यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!