शैक्षणिक

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे मानवनिर्मित बायोमेट्रिक हजेरी प्रणाली व नवनिर्वाचित वर्ग मंत्रिमंडळ विस्तार उद्घाटन संपन्न

केज/प्रतिनिधी

जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [माध्यमिक विभाग ] या शाळेमध्ये मानवनिर्मित बायोमेट्रिक हजेरी प्रणाली व नवनिर्वाचित वर्ग मंत्रिमंडळ विस्तार उद्घाटन दि.८ ऑगस्ट २०२५ वार शुक्रवार रोजी संपन्न झाले.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती शैलाताई इंगळे व उद्घाटक म्हणून जीवन विकास शिक्षण मंडळ केज संस्थेचे सचिव श्री. जी.बी.गदळे सर हे उपस्थित होते.तसेच मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे या देखील उपस्थित होत्या.इयत्ता ७ वी अ चे वर्गशिक्षक प्रबोधकांत समुद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे संपूर्णकार्य सुव्यवस्थित पार पाडले.पाहुण्यांचे स्वागत “सुजनांचे स्वागत करूया चला” या स्वागत गीताने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबोधकांत समुद्रे यांनी केले.

उपक्रम निर्माण करताना घेतलेले परिश्रम त्यामध्ये त्यांना मिळालेले सहकार्य याबद्दल माहिती देत शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास बौद्धिक, मानसिक,शारीरिक, सामाजिक,भावनिक व नैतिक विकास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी या पैलून मधून साकार झालेली ही संकल्पना या उपक्रमांच्या माध्यमातून विकसित करण्याचा हा प्रयत्न असे त्यांनी सांगितले. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त,आत्मनिर्भरता हे गुण विकसित होतात असे ते म्हणाले. प्रस्ताविकानंतर पाहुण्यांच्या हस्ते या दोन उपक्रमांचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. मानवनिर्मित बायोमेट्रिक हजेरी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरी घेतली जाते यामुळे वेळेची बचत होते,विद्यार्थ्यांना शिस्त लागते,विद्यार्थी आत्मनिर्भर बनतात. पुढे वर्ग मंत्रिमंडळ शपथविधी पार पडला त्यामध्ये आर्या लटपटे- मुख्यमंत्री,शौर्य बारगजे – उपमुख्यमंत्री,समृद्धी नेहरकर- गृहमंत्री, अपूर्वा सोनवणे- शिक्षणमंत्री,गुंजन घोळवे- शिक्षणमंत्री, श्रावणी लोंढे- नियोजन मंत्री,श्रेया धपाटे- आरोग्यमंत्री,किशोरी मुळे- वित्तमंत्री,सृष्टी अडसूळ- पर्यावरण मंत्री,सिद्धी क्षीरसागर- सांस्कृतिक मंत्री, संस्कृती गायकवाड- सांस्कृतिक मंत्री, तेजस्विनी कापरे- प्रसिद्धी मंत्री या वर्गमंत्र्यांनी शपथ विधी घेऊन कार्यभार स्वीकारला.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा विद्यार्थ्यांमध्ये शिस्त रुजावी वेळेचे नियोजन हे गुण विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमांमधून रुजण्यास चालना मिळते असे उद्गार करून वर्ग शिक्षकाचे अभिनंदन करून उद्घाटक श्री. जी.बी.गदळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापक शिवनंदा मुळे मॅडम यांनी ही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होईल असे त्या म्हणाल्या.अध्यक्षीय समारोपामध्ये बोलताना श्रीमती शैलाताई इंगळे मॅडम असे म्हणाल्या की,पूर्ण शाळेने तुमच्या वर्गाचा आदर्श घ्यावा वर्षभर हा उपक्रम असाच सुरळीत चालावा उपक्रमातच नव्हे तर अभ्यासातही तुमचा वर्ग अव्वल असावा व त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहावे असे त्या म्हणाल्या.सर्व वर्ग मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी मान्यवरांच्या साक्षीने शपथ घेऊन आपला पदभार स्वीकारला.या सर्व कार्यक्रमामध्ये वर्ग शिक्षक समुद्रे पी.एस. यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले.  कार्यक्रमाचे सूत्र संचालन सांस्कृतिक मंत्री सिद्धी क्षीरसागर हिने केले तर आभार दुसरी सांस्कृतिक मंत्री संस्कृती गायकवाड हिने मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!