इरा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल युसुफ वडगाव शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेतूनही आपले करिअर घडवले पाहिजे- बापूसाहेब भुसारी
एम.टी.एस.ऑलंपियाड राज्यस्तरीय परीक्षेतील मोमेंटो,गोल्ड मेडल व सिल्वर मेडल प्राप्त एकूण ५५ विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

केज/प्रतिनिधी
कै.सिद्धलिंगाप्पा भुसारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित,इरा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल युसुफवडगाव या शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ वर्षातील एम .टी. एस. ऑलंपियाड शासनमान्य राज्यस्तरीय परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जीवन विमा प्रतिनिधी धनंजय चोपणे तर प्रमुख पाहुणे म्हणून इरा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे संचालक तथा मुख्याध्यापक श्री. बापुसाहेब भुसारी यांची प्रमुख उपस्थिती होती. तर शाळेतील सहशिक्षिका सौ.अंजली तानगे, ॲडव्होकेट सौ. प्रियंका बापुसाहेब भुसारी,सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. प्रियंका थळकरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील सहशिक्षक तसेच एम.टी.एस. ऑलंपियाड समन्वयक सौ.पल्लवी अग्निहोत्री यांनी केले.याप्रसंगी त्या म्हणाल्या की,इरा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल या शाळेचा आलेख केवळ गुणात्मक नव्हे तर संख्यात्मक ही वाढत आहे.एम.टी.एस. ऑलंपियाड परीक्षेमध्ये स्पेशल मोमेंटो प्राप्त २ विद्यार्थी,गोल्ड मेडल प्राप्त २० विद्यार्थी, सिल्वर मेडल प्राप्त २१ पास १५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बापुसाहेब भुसारी म्हणाले की,विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेतून ही आपले करिअर घडवले पाहिजे.त्या दृष्टिकोनातून यशस्वी वाटचाल केली पाहिजे. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये विद्यार्थ्यांचा पाया घडविणाऱ्या शिक्षकांचे योगदान फार महत्त्वाचे असते.यशाची ही परंपरा अखंडपणे चालू ठेवण्याची ग्वाहीयावेळी त्यांनी दिली.शेवटी त्यांनी सर्व स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही अभिनंदन केले.
एम.टी.एस.ऑलंपियाड मधील ट्रॉफी प्राप्त विद्यार्थी
अर्जून सोमनाथ भुमकर,प्रियल उमाशंकर तोडकर, गोल्ड मेडल प्राप्त विद्यार्थी दिव्या प्रविण अग्नीहोत्री,गुंड समीक्षा गणेश,श्रीशा श्रीरंग तानगे,सिद्धि सचिन मोरे,विराज बालासाहेब इंगले,अथर्व महादेव सरकटे,सिद्धी संदिप जोशी,अखिलेश अमोल पाटील,अमित संदिप जोशी, शिवप्रसाद गणेश रोडगे,महिराज जयराज मांगडे,रियांश राधेश्याम खंडेलवाल,तन्वी अनंत थळकरी,स्वरूप शिवानंद भुसारी,परी उमेश खरबड,तन्वी आशिष जावळे,शरण्या शिवाजी पिल्ले,शांभवी शिवदास थळकरी, अपेक्षा राहुल सावंत इत्यादी.
एम.टी.एस.ऑलंपियाड सिल्व्हर मेडल प्राप्त विद्यार्थी हंडीबाग अनुष्का गजेन्द्र,राऊत पृथ्विराज अरुण,डोंगरे सार्थक अमोल,स्नेहल धनराज चोपने,उज्वल उमाकांत भुसारी,समर्थ ज्ञानोबा सुरवसे,शिवप्रसाद शाम लामतुरे, यशराज अरूण राऊत,आरव संतोष टिंगरे,आर्यन नवनाथ जाधव,प्रणव पवन इंगळे,प्रशांत विनोद एडके,रिशांक विजय भुमकर,स्वराली सचिन पाटू, शिवम शरद शिंदे, चौरे चैत्राली उमाकांत इत्यादी.
विद्यार्थ्यांच्या यशस्वीते साठी शाळेतील सर्व शिक्षकवृंदानी अथक परिश्रम व वेळोवेळी मार्गदर्शन केले.यामध्ये अंजली तानगे,योगिता चौधरी,पल्लवी अग्निहोत्री,शेख आफरीन,प्रियंका थळकरी,ज्योती वैरागे, गीता काळे,श्वेता मोडवे, प्रियंका भुसारी इत्यादी . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पल्लवी अग्निहोत्री यांनी केले.तर आभार प्रियंका बापुसाहेब भुसारी यांनी मानले.



